नीरज राऊत

पालघर: स्मशान हे मृत व्यक्तीला अंतिम निरोप देण्याचे ठिकाण असून त्या परिसरात फिरतानाही अनेकांना भीतीदायक वातावरणाचा सामना करावा लागतो. मात्र पालघर तालुक्यातील सफाळा येथे स्मशानाची रंगरंगोटी करून स्मशानामध्ये चक्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ८० पेक्षा अधिक महिलांचा सहभाग लाभला. निमित्त होते हे अवयवदान व देहदान जागृती करण्यासंदर्भात ”  स्मशान हे जंक्शन” या कार्यक्रमाचे आयोजन… १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मीमारा कला स्कूल, चित्रकार राजेश्री आपटे आर्ट फाउंडेशन, सफाळे ग्रामपंचायत, राऊत कुटुंबीय तसेच द फेडरेशन फॉर ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमान देहदान व अवयवदान जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

हेही वाचा >>> पालघरमधील रुग्णांची गुजरातवर भिस्त; आरोग्यसेवेकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

या पार्श्वभूमीवर देशभरातील नामांकित चित्रकारांनी १४ व १५ ऑक्टोबर रोजी सफाळे स्मशानभूमीच्या २५० फूट लांबीच्या भिंतीवर अवयवदान संदर्भातील देश-विदेशातील विविध टपाल तिकीटांवरील चित्र भिंतीवर रेखाटली व रंगवली. त्यासाठी स्थानिक चित्रकार, कलाशिक्षक, विद्यार्थी व नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला. अवयवदान व देहदान संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चार गटांमध्ये जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना सफाळे स्मशानभूमी आयोजित कार्यक्रमात बक्षीसे प्रदान करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सिसिलिया कारवालो, द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, सफाळेच्या सरपंच तनुजा कवळी, उपक्रमासाठी पुरस्कृते कोकियो कॅमलिनचे स्थानीय व्यवस्थापक अजित राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यात आपल्या वडिलांचे देहदान करणाऱ्या राजू चुरी व अनिल करवीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच चित्रकार संजय सावंत यांनी चित्रकारांच्या दृष्टिकोनातून राबवलेल्या या उपक्रमाची माहिती दिली.

आपला देश वेगवेगळ्या प्रकारच्या दानामध्ये अग्रेसर असला तरी देहदान करण्यात मागे पडल्याचे सांगत “जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी”, असे या दानामुळे मृत्यूनंतर देखील आपण जिवंत राहू शकतो असे पुरुषोत्तम पवार यांनी प्रतिपादन केले. “मी स्मशानात जाणार नाही” असे ठाम विचार व्यक्त करत मृत्यूनंतर आपल्या देहाची राख अथवा माती होऊ न देता इतरांच्या माध्यमातून जिवंत राहावे यासाठी नागरिकांनी प्रतिज्ञा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा >>> Navratri Ustav 2023: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी

‘यमदान ते देहदान’ असे दरम्यानच्या काळामध्ये झालेल्या बदलाबद्दल डॉ. सिसिलिया कारवालो यांनी विवेचन करताना स्मशानभूमीत आयोजित केलेल्या या अभिनव कार्यक्रमातील वेगेळेपणा उलगडला. आपल्या देहाचे दान करण्याचे आपण निश्चित केले असून आपल्या सजीव इंद्रियांनी इतरांचे जीवन फुलवावे असे विचार त्यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत आपण अनेकदा जिवंतपणे मृत्यू अनुभवात असताना अवयवदान व देह दानामुळे नव्या जन्माच्या रूपाने अंकुर फुटणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. वेगवेगळ्या साहित्यामध्ये या यासंदर्भात झालेल्या लिखाणाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

स्मशान एक जंक्शन

देहदान, अवयवदान करावे म्हणजे स्मशान हे अंतिम स्थानक न ठरता स्मशान एक जंक्शन होईल..

सहभागी चित्रकार:

प्रकाश राजेशिर्के, फिलीप डिमेलो, रवी मंडलिक, सुदर्शन शेट्टी, मंगेश चोरगे, सुनील पडवळ, सेजल क्षिरसागर, विशाखा आपटे, अर्चना सावंत, संजय सावंत, चार्ली कोरीया, विजयराज बोधनकर, वैभव ठाकुर, सचिन सटाणकर, संतोष शेलार, सागर सुतार, चित्रगंधा सुतार, विशाल यादव, लीलाधर रायसिंग, प्रणय फराटे