लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेनेतर्फे सुचवण्यात येणाऱ्या दोन नागरिकांची स्वीकृत नगरसेवक पदी नेमणूक करण्यासाठी १२ जुलै रोजी अर्ज दाखल करावयाचे असताना शिवसेना पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नगर परिषदेमधील गटनेते कैलास म्हात्रे यांना पदावरून हटविण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. पक्षाच्या गटनेत्याकडून या दोन नावांची शिफारस होणे अपेक्षित असताना विद्यमान गटनेत्यांचा अधिकार ग्राह्य धरू नये असे आदेश पक्षाने काढल्याने नवीन तांत्रिक पेज निर्माण झाला आहे.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात
Assembly Election 2024 NCP Congress Ajit Pawar Group BJP Uddhav Thackeray Group
अजित पवार गटामुळे भाजपला गळती?
mla sudhir gadgil marathi news
सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी
Eknath shinde marathi news
Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा; म्हणाले, “आरोपींना थेट…”
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis, BJP, Congress, Anil Wadpalliwar, High Court, women s schemes, election strategy, Eknath Shinde, Nana Patole, Maharashtra politics,
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या निशाण्यावर आलेले वडपल्लीवार आहेत तरी कोण ?

२० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या नेमणुकी संदर्भातील सभा सदस्यांनी दिलेल्या पत्रावरून तसेच अपरिहार्य कारण नमूद करून स्थगित करण्यात आले होते. या प्रकरणात शिवसेनेचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागून २२ जून पासून तीन आठवड्यात निवडणुका घेण्याची आदेश प्राप्त केले होते.

आणखी वाचा-पालघर: विक्रमगड तालुक्यातील ११ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पालघर मध्ये एकत्रित शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अजूनही अधिकृत फूट पडलेली नसून कैलास म्हात्रे हे गटनेते म्हणून विराजमान आहेत. दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटाकडून रईस खान व ॲडव्होकेट धर्मेंद्र भट यांची नाव पुढे येत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सुनील महेंद्रकर व मनोज घरत यांची नावे चर्चेला आहेत.

अशा परिस्थितीत कैलास म्हात्रे या गटनेत्यांचे पत्र ग्राह्य धरले जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार यांची नेमणूक होण्याची शक्यता पाहता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय कडून सचिव संजय मोरे यांनी १० जुलै रोजी कैलास म्हात्रे यांना पक्षविरोधी कारवाया पाहता त्यांना शिवसेना पक्षाकडून गटनेते पदावरून हटवण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

आणखी वाचा- सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांच्याबद्दल आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “…आता त्यांना गोळ्या घालणार का?”

स्वीकृत नगरसेवकांची १३ जुलै रोजी आयोजित बैठकीमध्ये नेमणूक होणार असली तरीही उद्या १२ जुलैपर्यंत त्याकरिता अर्ज दाखल करणे अपेक्षित आहे. या अर्जांची जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकारी यांच्यामार्फत छाननी होऊन नंतर सभेमध्ये नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली (पीठासीन अधिकारी) संपन्न होणाऱ्या सभेमध्ये याबाबतचा निर्णय जाहीर करणे अपेक्षित आहे. विद्यमान गटनेत्यांचे अधिकार गोठवण्यात आल्याने सहा ते सात महिन्यांच्या कार्यकाळासाठी कार्यरत राहू शकणाऱ्या या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रिया पेच निर्माण झाला आहे.

नवीन गटनेता कोण ?

शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांच्या समक्ष उपस्थित राहून गटनेता निवडण्याची प्रक्रिया राबवली जाते. जुन्या गटनेत्यांवर अविश्वास दाखविल्याचे कोणतेही पत्र आजवर सादर करण्यात आले नसल्याने या निवडणुकीमधील रंगत वाढली आहे. शिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नवीन गटनेता यांची निवड करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने गटनेता नसल्याचे कारण पुढे करत ही निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव सत्ताधारी गटाने केल्याची चर्चा आहे. मात्र तीन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण न केल्यास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होईल अशी टांगती तलवार जिल्हा प्रशासनावर आहे. याबाबत जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेले तत्सम अधिकारी कोणती भूमिका घेतात यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान पालघर शहरातील शिवसेना नगरसेवकांमध्ये अजूनही अधिकृत फूट पडली नसली तरीही शिवसेनेसोबत (शिंदे गट) असणारी नगरसेवक पक्षाची संपर्कप्रमुख यांच्या शिफारस पत्राद्वारे आपल्या मर्जीतील नगरसेवकांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

नगर परिषदेतील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष माझी गट नेता म्हूणन निवड करण्यात आली आहे. माझ्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर असून गट नेता पदावरून हटविणे किंवा नवीन गटनेत्यांच्या निवड करणे हा निवडून आलेल्या नगरसेवकांचा अधिकार आहे. या संदर्भात आपण भूमिका योग्य वेळी योग्य ठिकाणी मांडीन. -कैलास म्हात्रे