जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; कर्करोग निदान कार्यक्रमांतर्गत माहिती उघड

पालघर : राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्याात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याातील नागरिकांची असंसर्गजन्य रोग तपासणी करण्यात आली होती. यामध्ये या सहा महिन्यांच्या कालावधीत पालघर जिल्ह्याात दोन जणांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. तर १५ जणांना कर्करोगाचे लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी विविध प्रकारच्या कर्करोगाने पालघर जिल्ह्याात १५  जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याामध्ये कर्करोग फोफावतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग यामुळे मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कर्करोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्याातही गेल्या चार महिन्यांपासून कर्करोग निदान व नियंत्रण कार्यक्रम सुरू आहे. वेळीच हा कार्यक्रम सुरू केल्यामुळे कर्करोग असलेल्या व लक्षणे आढळलेले रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच उपचार देऊन कर्करोग नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

जानेवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये या कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्याात आठही तालुक्यांमध्ये ३७ हजार ६७९ नागरिकांची तपासणी केली गेली. या तपासणीमध्ये १५ जणांना कर्करोगाची लक्षणे असल्याचे सामोर आले. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लक्षणे आढळल्यानंतर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यामार्फत पुढील तपासणी केली होती. त्यातून त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले.

यामध्ये तोंडाचा कर्करोग असलेले सहा रुग्ण आहेत. स्तन कर्करोग झालेले पाच रुग्ण, तर गर्भाशयाचा कर्करोग झाल्याच्या चार रुग्णांची नोंद आहे. या सहा महिन्यांत तोंडाचा व गर्भाशय कर्करोग यामुळे प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे.

हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय या दोघांच्या समन्वयाने जिल्ह्याामध्ये राबवला जातो. गावागावांमध्ये असलेल्या आशा सेविकांमार्फत नमुन्यांमध्ये नागरिकांची माहिती गोळा केली जाते. त्यापैकी ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करून त्यातील जोखीम रुग्ण असलेल्यांची तपासणी केली जाते. यामध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब तसेच हायपर टेन्शन या आजाराचे रुग्ण तपासणी केली जातात. यामध्ये कर्करोगाची लक्षणे आढळलेला रुग्णांना वरिष्ठ स्तरावर तपासणीसाठी पाठवले जाते. तेथून कर्करोगाचे निदान होते. पालघर जिल्ह्याात पाच महिन्यांतच १५ रुग्ण आढळून आल्याने हा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले जात आहे.

३७३ मृतदेहांचे सरासरी सर्वेक्षण

मार्गदर्शक सूचना अनुषंगाने विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या ३७३ मृतदेहांचे सरासरी सर्वेक्षण केल्यानंतर त्यामध्ये मृत्यू झालेले हे दोन रुग्ण कर्करोगी असल्याचे आढळले आहे. डहाणू तालुक्यात तपासणी केलेल्या ७,५३२ रुग्णांपैकी तोंडाचा कर्करोग असलेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर स्तनाचा कर्करोग असलेले दोन रुग्ण आढळले आहे. पालघर तालुक्यात दहा हजार ९६२ तपासणी केलेल्या रुग्णांपैकी तोंडाचा कर्करोग असलेल्या दोन रुग्णांचे निदान झाले आहे. तर स्तनाचा कर्करोग असलेल्या एका रुग्णाचे निदान झाले आहे. वाडा तालुक्यात तीन हजार ८३१ रुग्णांचे तपासणी केली असता त्यामध्ये दोन रुग्णांना तोंडाचा कर्करोग तर चार रुग्ण गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपचार सुरू आहेत.

कर्करोग नियंत्रणाच्या दृष्टीने हा कार्यक्रम रुग्णांसाठी प्रभावी आहे. कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता समोर येऊन तपासणी केल्यास त्याचे वेळीच निदान होते व ते नियंत्रणात आणणे शक्य आहे. त्यामुळे तपासणी करणे हाच यावर एकमेव उपाय आहे. – डॉ. तन्वीर शेख, नोडल अधिकारी, राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम