पालघर : पालघर सह ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा व गडचिरोली या नऊ जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाने १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ४३० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अर्ज करण्याला मुभा राहणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाप्रमाणे एक हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर आवश्यक असताना राज्यातील डॉक्टर उपलब्धतेचा दर ०.८४ इतका आहे. राज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांश पद रिक्त आहेत. त्यामुळे राज्याच्या निमशहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेला आरोग्य विषय प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेल्या जागृकतेच्या अनुषंगाने नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणे आवश्यक होते. वैद्यकीय शिक्षण व आरोग्य द्रव्य विभाग यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला २८ जून रोजी संपन्न झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली असल्याचे १४ जुलै रोजी जारी शासन निर्णयात जाहीर करण्यात आले आहे.

Five times increase in admission fee in private AYUSH colleges
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
Government Medical College in the district approved at Hinganghat in wardha
वर्धा : हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा अखेर ठरली, प्रवेशाबाबत ..
Babaji Date College of Arts and Commerce was given a grant despite its low marks
यवतमाळ : बाबाजी दाते कला, वाणिज्य महाविद्यालयावर शासनाची कृपादृष्टी! गुणांकन कमी असतानाही…
The Medical Education Department has decided to take action against colleges that charge admission fees Mumbai news
प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा
State Government decision to start virtual labs in agricultural colleges under agricultural universities Mumbai news
कृषी महाविद्यालयामध्ये आभासी प्रयोगशाळा उभारणार
Solapur, CCTV cameras, school safety, education department, Badlapur sexual abuse case, student protection, private schools, Zilla Parishad schools,
सोलापूर जिल्ह्यात शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची लगबग

पालघर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार प्रथम वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यामध्ये ४३० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी शासकीय वैद्यकीय विद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अर्ज सादर करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मंजूर झालेल्या नऊ जिल्ह्यांपैकी पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, बुलढाणा, वाशिम, भंडारा व गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांकरिता आवश्यक जमीन महसूल विभागाच्या सहमतीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात राज्य मंडळाने मान्यता दिली आहे. पालघर येथे सध्या सिडकोने दिलेल्या दहा एकर भूखंडामध्ये दोनशे खाटांचे रुग्णालय उभारणीचे काम सुरू असून या कामासाठी सुमारे २०९ कोटी रुपये खर्च येणार आहे.

उर्वरित २३० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी व संलग्न प्रशासकीय इमारत, अचिकित्सालयीन व चिकित्सालयीन विभाग, अधिकारी कर्मचारी आवास व विद्यार्थी वस्तीगृहासाठी एकूण २५ एकर जागेची आवश्यकता असून उभारण्यात येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात अतिरिक्त १५ एकर जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. प्रस्थापित महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामासाठी २१७ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून इमारत व बांधकाम यांचा सामूहिक उपकरणे महाविद्यालय अधिकारी, कर्मचारी रुग्णालय कर्मचारी व इतर खर्च धरून प्रत्येक महाविद्यालयासाठी ४८५ कोटी रुपयांचा शासनाने तात्विक मंजुरी दिली आहे.

५० खाटांच्या आयुर्वेद रुग्णालयाचा प्रस्ताव

केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय आयुष अभियान प्रकल्प अंतर्गत पालघर जिल्ह्यात ५० खाटांचे एकात्मिक आयुष आयुर्वेद रुग्णालय मंजूर झाले असून या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सहा एकर जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या रुग्णालयामार्फत अडीच लाख लोकसंख्येला आरोग्यसेवा पुरवण्यात येणार असून या रुग्णालयाकरिता इमारत, निवासस्थान, साहित्य, उपकरण यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय पालघर नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणार असून या आयुर्वेदिक रुग्णालयाबरोबर राष्ट्रीय आयुष अभियान प्रकल्प अंतर्गत या ठिकाणी होमिओपॅथी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी संशोधन करण्याचा व इतर संलग्न विभागाची उभारणी करण्याचे विचाराधीन असल्याचे प्रस्तावित आहे.