नीरज राऊत
पालघर: शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील आमदार व खासदारांचा पाठिंबा लाभला असला तरी एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या विद्यमान भागातील मोठे मासे गळाला लागले नव्हते. त्यानंतर वेगवेगळय़ा प्रकारे स्थानिक नेत्यांची बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात एन्ट्री झाली. तरीही पालघर जिल्ह्यावरील पकड घट्ट करण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गट व भाजपचा कस लागणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये दलबदल झाल्याने थेट सरपंच निवडणुकीमध्ये दोन्ही गटाची कामगिरी सुमार राहीली. त्यानंतर झालेल्या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत मोखाडा वगळता शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) सत्तापालट करणे शक्य झाले नाही. जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेत बहुजन विकास आघाडी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही सहभाग होता, मात्र शिवसेनेत फूट पडल्याने सत्ता समीकरणात बदल होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर २० सदस्य संख्या असणाऱ्या शिवसेनेतील निम्म्या सदस्यांनी कालांतराने शिंदे गटाला समर्थन दिले होते, मात्र १३ सदस्यांचा गट असणाऱ्या भाजपच्या मदतीने पालघर जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी २९ सदस्यांचे बलाबल आवश्यक असून बाळासाहेबांच्या शिवसेनेला किमान १६ सदस्यांचे समर्थन लाभल्याशिवाय भाजपसोबत गणित बसणे कठीण आहे. शिवसेनेमधून विजयी झालेल्या दोन सदस्यांच्या एका आप्तेष्टाने अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्या दोन सदस्यांचा शिवसेना शिंदे गट-भाजप यांच्या युतीला पाठिंबा राहील अशी शक्यता आहे. त्याचबरोबर सत्ताधारी युतीने राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यासाठीही प्रयत्न चालविले असून जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घातले आहे.