लोकसत्ता वार्ताहर

कासा : मोखाडा शहरामध्ये रविवारी रात्री साडेसात वाजण्याची सुमास दफनभूमी जवळ आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या मुलीवर अतिप्रसंग झाल्याची शक्यता असून याविषयी पोलिसांमार्फत तपास सुरू आहे.

maharashtra assembly election 2024 eknath shinde cheated me says palghar mla srinivas vanga
एकनाथ शिंदेंनी मला फसवलं; उमेदवारी डावललेल्या आमदार श्रीनिवास वनगा यांचे वक्तव्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maha Vikas Aghadi, Hitendra Thakur, bahujan vikas agahdi
हितेंद्र ठाकूर एकाकी, महाविकास आघाडीची दारे बंद
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

घरालगत राहणाऱ्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेली मुलगी काही वेळानी घरी परतली होती. मात्र पुन्हा मैत्रिणीकडे जेवणासाठी जाते असे सांगून ती निघाली. मात्र बराच वेळेनंतर ती वाढदिवसाच्या ठिकाणी पोहोचली नसल्याने शोधाशोध सुरू झाली.

आणखी वाचा-मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप

रात्री दहा वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह सापडल्यानंतर सदर मुलीवर अतिप्रसंग झाला असल्याची शक्यता प्रथम दर्शी वाटत असल्याने शवविच्छेदनासाठी व अधिक तपासासाठी नाशिक येथे पाठवण्यात आलेला आहे.

या घटनेचा तपास मोखाडा पोलीस करीत आहेत. मोखाडा पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे मोखाडा व परिसरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

Story img Loader