लोकसत्ता, प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: पालघर तालुक्यातील चहाडे, आल्याळी, शिरगाव व मासवण येथील तलाठी कार्यालयांचा पदभार सांभाळणारे तलाठी महेशकुमार जनार्दन कचरे याला दहा हजाराची लाच घेताना सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पालघर येथे रंगेहात अटक केली.

चहाडे येथील एका प्रकरणात जमीन खातेदार यांच्या फेरफारकामी पंधरा हजारांच्या लाचेची मागणी काचरे यांनी केली होती. तक्रारदार यांनी तशी तक्रार पालघरच्या लाचलुचपत विभागाकडे केली.पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास व विलास भोये, योगेश धारणे, संजय सुतार,निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दिपक सुमडा या कर्मचारिवर्गाने सापळा रचला. पालघर येथील शुक्ला कंपाऊंड परिसरात दहा हजाराची लाच तलाठी कचरे यांनी स्वीकारली व आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने सिनेमा स्टाईल पाठलाग करत त्याला पकडले. पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे विभागाने म्हटले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talathi maheshkumar kachare arrested for taking bribe of ten thousand mrj
Show comments