वाडा: पालघर जिल्ह्यातील मनोर येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेला शिक्षक असणाऱ्या पतीकडून मारहाण होत होती. याबाबचा खटला गेल्या सहा वर्षांपासून पालघरच्या जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित होता. या खटल्याचा निकाल नुकताच लागला असून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सहा महिने कारावासाची शिक्षा व पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनोर येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या या महिलेला तिचा शिक्षक पती सुदर्शन प्रकाश पाटील (मूळ राहणार पडळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हा नेहमीच पैशाची मागणी करीत असे व पैसे न दिल्यास मारहाण करीत असे. ११ सप्टेंबर २०१५ रोजी सुदर्शन पाटील यांनी आपल्या शिक्षक पत्नीला ठोशा, बुक्क््यांनी व लाकडी दंडुक्याच्या सहायाने बेदम मारहाण केली होती. यावेळी या शिक्षिकेला बेशुद्ध अवस्थेत ढवळे रुग्णालय, मनोर येथे दाखल करण्यात आले होते. वारंवार होणाऱ्या मारहाण व छळाला कंटाळून या शिक्षिकेने मनोर पोलीस ठाण्यात १३ सप्टेंबर २०१५ रोजी पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या शिक्षिकेच्या पतीला अटकही झाली होती. 

या खटल्याचा निकाल नुकताच पालघर जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती एस. एस. गुल्हाने यांनी दिला आहे. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. डी. आर. तरे, अ‍ॅड. एस. बी. सावंत आणि फिर्यादीतर्फे अ‍ॅड. अमृत अधिकारी यांनी काम पाहिले.