कासा, विजय राऊत

विक्रमगड पंचायत समितिने तालुक्यातील शिक्षकांच्या पगारातून कापला जाणारा आयकर भरणा वेळेवर न केल्यामुळे शिक्षकांना ४४ लाख ८६ हजार रुपयांचा दंड आकारणी करून खुलासा करण्यासाठी आयकर विभागाकडून नोटीस वाजवण्यात आल्या आहेत.

Avinash Deshmukh
एकाच इमारतीत चालतात तीन शाळा? शिक्षणाधिकाऱ्यांचे नातलगच त्या शाळेत शिक्षक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपानंतर खळबळ
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
pune teachers appointment news in marathi
राज्यातील पात्रताधारकांना दिलासा… कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द
Primary teachers committee alleges that educational materials are being distributed to government schools under the name of Asr
‘असर’च्या नावाखाली शैक्षणिक साहित्य सरकारी शाळांच्या माथी, प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप…
Hyderabad techies donating to political parties and claiming tax rebates.
IT कर्मचाऱ्यांचं राजकीय पक्षांवर वाढलेलं प्रेम प्राप्तीकर विभागाला खटकलं, अन् उघडकीस आला ११० कोटींचा घोटाळा
Despite mla Sudhakar Adbales letter tourists are being cheated with high fees in Tadoba Reserve
शिक्षक आमदाराच्या पत्रानंतरही ताडोबात पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले
hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार

विक्रमगड तालुक्यात जवळपास ५०० च्यावर शिक्षक कार्यरत आहेत. आयकर विभागाच्या नियमानुसार मागील वर्षी जो एकूण आयकर भरला होता; त्याच्या १० टक्के दरमहा पगारातून कपात करून आयकर विभागाला भरणा करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व आयकर भरणा करणाऱ्या शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात करण्यात आली. परंतु ही केलेली कपात आयकर विभागात जमा करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे आर्थिक वर्षाअखेर आयकर विवरण व पपत्र १६ नुसार राहिलेल्या आयकरची रक्कमही कपात करण्यात आली. परंतु ही केलेली कपात ही वेळेत आयकर विभागाच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. त्यामुळे आयकर विभागाने सर्व करपात्र शिक्षकांना आयकर, दंड आणि व्याज स्वरूपात अतिरिक्त रक्कम भरण्याच्या नोटीस पाठवून भरणा करण्यास सांगितले आहे. विक्रमगड शिक्षक समन्वय पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकारामध्ये कार्यालयाची चूक आहे. परंतु कार्यालयाच्या चुकीमुळे शिक्षकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा >>> पालघर : बोईसर चिल्हार मार्गावरील भीषण अपघातात दोन ठार, धोकादायक वळणावर अपघातांची मालिका सुरूच

आयकर विभाग वेळेत आयकर न भरल्यास ५००० रु दंड अधिक व्याज अशा पद्धतीने अतिरिक्त रक्कम भरण्यास सांगते. त्यामुळे आयकर विभागाने प्रत्येक शिक्षकाला जवळपास १० हजार ते २५ हजार रु च्या दरम्यान अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत. तालुक्यातील सर्व शिक्षकांना मिळून ४४ लाख ८६ हजार रुपये रक्कम दंड आणि व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त भरावी लागणार आहे. शिक्षकांच्या वेतनातून विहित वेळेत आयकर कपात होऊनही हा अतिरिक्त दंड भरण्यासाठी नोटीस आल्यामुळे नेमका हा दंड कोणी भरायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्येक वर्षी कार्यलयाकडून सर्व कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षी बसलेल्या एकूण आयकरच्या १०% दरमहा या प्रमाणे आयकर कपात केली जाते. ही केलेली कपात रक्कम आयकर विभागाच्या खात्यावर दरमहा भरणे आवश्यक आहे.बँकेत रक्कम भरल्यानंतर चलन अपडेट टीडीएस केला जातो. परंतु विक्रमगड पंचायत समितीकडून ही केलेली कपात वेळेत बँकेत भरणाच केला नाही. त्यामुळे वेळेत कर भरला गेला नाही. त्याचा दंड आकाराला आहे. तालुक्यातील सर्व शिक्षकांना मिळून जवळपास ४४ लाख ८६ हजार दंड आकारण्यात आलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आकारलेला दंड पंचायत समितीला भरणे शक्य नाही. त्यामुळे वेळेत करकपात होऊनही शिक्षकांनाच हा दंड भरावा लागणार आहे. विक्रमगड तालुका शिक्षक समन्वय समितीने हा दंड कार्यालयाच्या चुकीने आकारला आहे त्यामुळे दंडही कार्यालयाकडून भरला जावा अशी मागणी केली जात आहे. कार्यालयाने दंड न भरल्यास सर्व शिक्षक जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करतील असा इशारा समन्वय समितीकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पालघर : कवडास उन्नई बंधाऱ्याच्या उजव्या कालव्यावर अवलंबून असलेला शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत, रब्बी हंगाम धोक्यात

पगारातून आयकर रक्कम कपात केली जाते

प्रत्येक महिन्याला आमच्या पगारातून आयकर रक्कम कपात केली जाते, व फेब्रुवारी च्या पगारात आयकर विवरण प्रपत्र १६ नुसार राहिलेली रक्कम कपात केली जाते. वेळेवर कपात होऊन सुद्धा कार्यालयाच्या चुकीमुळे आम्हाला प्रत्येकी १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसला आहे असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

विक्रमगड तालुक्यातील शिक्षकांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी लवकरच गटविकास अधिकारी यांना जिल्हा परिषद कार्यालयात बोलवून चौकशी करण्यात येईल. आणि या प्रकारात जे दोषी असतील त्यांनाच तो दंड भरावा लागेल.

– प्रकाश निकम, अध्यक्ष,

जिल्हा परिषद पालघर शिक्षकांच्या आयकर च्या बाबतीत अद्याप मला माहिती  नाही. याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल. – हणमंतराव बोडके, गटविकास अधिकारी  विक्रमगड

Story img Loader