डहाणू: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे उड्डाणपुलावर सोमवार ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास रसायन वाहतूक करणाऱ्या टँकर ने सिमेंट पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातात टँकर फुटून मोठ्या प्रमाणत रसायनाची गळती झाली असून चालक टँकर मध्ये अडकला आहे. तर सिमेंट पाईप वाहून नेणाऱ्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघातामुळे महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. दरम्यान स्थानिकांनी टँकर मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>दापोलीत कासवाच्या पहिल्याच घरट्यात ११८ अंडी

वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रसायन गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रसायन ज्वलनशील नसल्याची खात्री पटल्यानंतर नागरिकांनी वाहनजवळ जाऊन मदतकार्य सुरू केले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrible accident on vivalwedhe flyover amy