आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या ट्रकचा व ट्रक मालकाचा शोध सुरू असून कासा भागात ट्रक मालक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा असून ड्रायव्हरचे नाव उमेश यादव आणि मालकाचे नाव रामबचन यादव असल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा ट्रक गुजरात दिशेला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शोध घेण्यासाठी पालघर पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले होते. आता दमण इथे तो ट्रक सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The truck that caused mete car accident was found in daman amy