नीरज राऊत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालघर : संक्रांत सणानिमित्त पालघर तालुक्यातील डहाणू, पालघर व वसई तालुक्यातील वाडवळ बांधवांसह इतर समाजबांधव कोनफळ, वेलवर्गीय भाज्या व इतर पदार्थांपासून उकडहंडी तयार करीत असून त्यासाठी लागणारा भाजीपाला व इतर साहित्याच्या खरेदीला मोठी मागणी आली आहे.
कंद, रताळी व भाज्यांचा समावेश असलेल्या या पदार्थाला गुजराती समाजात उंधियु असे संबोधले जाते, कोकणामध्ये पोपटी, तर राज्याच्या इतर भागात भोगीची भाजी म्हणून देखील ओळख आहे. पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या गावांमध्ये हे खाद्यापदार्थ संक्रांतीच्या दिवशी आवर्जून खाल्ले जातात.
हेही वाचा >>>पालघर : महायुती मेळाव्यात पक्षीय कार्यकर्त्यांनी फिरवली खासदारांकडे पाठ
पूर्वी या सर्व भाज्या मातीच्या मडक्यामध्ये भरून शिजवल्या जात असत. मात्र कालांतराने चुलीवर मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये अथवा कुकरमध्ये गॅसवर भाज्या- कंदाचे मिश्रण शिजवले जाते. तेलविरहित या भाजीला तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या सणाला आपल्या आप्तेष्टांना या शिजलेल्या भाजीची भेट देखील दिली जाते.
तेलविरहित इकडहंडी या भाजीला तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या सणाला आपल्या आप्तेष्टांना या शिजलेल्या भाजीची भेट देखील दिली जाते.
उकडहंडीच्या भाज्या…
कोनफळ, कंद, रताळे, बटाटा, शेंगदाणे, वालाचे गोळे, हिरवे चणे, वाटाणे, वांगी, हिरव्या पातीचा कांदा, नवलकोल, शेवगाच्या शेंगा, तूर, हरभऱ्याचे चणे, तरले, हिरवी मिरची इत्यादी भाज्या चिरून टोपात मीठ, मसाला, तीळ, ओला नारळ, कोथिंबीर, गरम मसाला, मिरची पावडर, हळद यांच्यासोबत मिश्रण करून त्याला पाण्याशिवाय वाफेवर शिजवले जाते.