पालघर: वर्षअखेर आणि नववर्ष हे दिन यंदा शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे त्याच्या स्वागताची जय्यत तयारी अनेक ठिकाणी सुरू आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारे व पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मांदियाळी आतापासूनच सुरू झाली आहे. दोन वर्षांच्या निर्बंध मुक्तीनंतर पर्यटक नववर्ष स्वागताचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
समुद्रकिनारे, कृषी, निसर्ग आदी प्रेक्षणीय पर्यटनस्थळांवर पर्यटकांची रेलचेल सुरू झाली असून या सर्व पर्यटनस्थळांच्या आजूबाजूच्या परिसरात असलेली निवासस्थाने, लॉज, रिसॉर्ट, खासगी भाडेकरू खोल्या, वसतिगृह नववर्षांच्या स्वागतासाठी हाऊसफुल झालेली आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनाही यंदा चांगलाच दिलासा मिळाला आहे. स्थानिकांनाही चांगला रोजगार प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील केळवे, बोर्डी, शिरगाव, चिंचणी, डहाणू, वसई व इतर समुद्रकिनारा परिसरामध्ये असणारे रिसॉर्ट आतापासूनच हाऊसफुल होऊ लागलेले आहेत. शुक्रवारपासून पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करण्यासाठी तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी दाखल होणार आहेत, असे नोंदणीवरून दिसून येते. विशेषत: घरगुती व ग्रामीण भागातील रुचकर जेवणाला पर्यटकांची मागणी असून त्यासाठीही आगाऊ नोंदणी करण्यात आली आहे. किनारा भागात मासळी खवय्ये यांनीही आधीच खानावळी व इतर ठिकाणी नोंदणी करून ठेवल्या आहेत. तर मद्यप्रेमींसाठी तात्पुरते मद्य परवाने देण्यात येणार असून खासगी ठिकाणी हे परवाने वापरता येणार आहेत. पर्यटनस्थळांसह इतर ठिकाणी आयोजित केलेल्या नवनवीन कार्यक्रमांकडे तरुणांचा मोठा कल आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येच्या मौजमजेसाठी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र साजरा होणाऱ्या नववर्षांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. याचबरोबरीने जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत ही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
निर्बंधानंतर यंदा पर्यटन व्यावसायिक व उद्योगासाठी दिलासा देणारा काळ आहे. नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची चांगलीच रेलचेल आहे. बुकिंगही समाधानकारक असल्याने पर्यटन उद्योगातून मोठा रोजगार उभा राहणार असल्याचे पर्यटन व्यावसायिक आशीष पाटील यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी खबरदारी
नववर्ष स्वागतासाठी केळवे समुद्रकिनारी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतेसाठी व सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. किनारा परिसर स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावून स्वच्छता केली जाणार असून तीन लाइफ गार्ड पर्यटक सुरक्षेसाठी किनारा भागात तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप किणी यांनी दिली.