नीरज राऊत / कुणाल लाडे

देशामध्ये डिजिटल क्रांती होत असताना राज्याच्या सीमावर्ती भागात तलासरी तालुक्यातील दापचरी येथे असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा वाहन तपासणी नाक्यावर दररोज वाहतूक कोंडी व वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. तपासणी नाक्यावरील हे चित्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दिसून येत असून लहान वाहनांना त्याचा नाहक त्रास होत आहे. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांमध्ये वेगवेगळया प्रकारे होत असून दररोज सरासरी २२ हजार वाहनांची वर्दळ या तपासणी नाक्यावरून होत असते. तसेच दक्षिण गुजरात मधून मुंबई विमानतळ येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत या ठिकाणी होणारी कोंडी राज्य सरकार कडून दुर्लक्षित राहिली आहे.

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई

मुंबई तसेच गुजरात राज्यामधून दोन्ही दिशेला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तू, कच्चा माल, रसायन घेऊन ट्रक, टँकर व ट्रेलर यांची वर्दळ सुरू असते. महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांचे वजन, वाहनांची कागदपत्र त्यांची योग्यता तसेच वाहन वाहून नेत असलेल्या वस्तूंची कागदपत्रे तपासणी करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून सन २०१२ च्या अखेरीस दापचरी येथे तपासणी नाक्याची स्थापना करण्यात आली. याठिकाणी अवैद्य व अवजड वाहतुकीवर रोख लावणे तसेच राज्याचा महसूल वाचवण्याचा दृष्टीने अत्याधुनिक व्यवस्था उभारण्यात आली. मात्र अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली यंत्रणा सध्या जीर्ण झाली असून यामध्ये वेळोवेळी बिघाड होत असल्यामुळे संबंधित यंत्रणा आणि नागरिकांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

या तपासणी नाक्यावर मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर १० तर गुजरात कडून येणाऱ्या वाहिनीवर १२ असे एकूण २२ इलेक्ट्रॉनिक वजन काटे कार्यरत आहेत. या काट्यांवर अवजड वाहन स्थिर केल्यानंतर त्याची वजन मापन करून त्याची नोंद केली जाते. ज्या वाहनांचे वजन मर्यादेपेक्षा अधिक असते त्याची माहिती तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ दिली जाते. या अधिकाऱ्यांकडून दोशी असणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येते तसेच इतर कागदपत्रांची व आवश्यकता भासल्यास वाहनांमधील वस्तूंची तपासणी केली जाते.

वाहनांला इलेक्ट्रॉनिक काट्यावर उभे करून वजनाची तपासणी करण्यासाठी २० ते ४० सेकंदांचा अवधी लागतो. वाहनांची संगणकामध्ये नोंद करणे तसेच वजन माप केल्याच्या बदल्यात त्याचा शुल्क घेण्यात येतो. शुल्क आकारणी दरम्यान सुट्टे पैशांची देवाण घेऊन करण्यास अवधी लागत असल्याने तसेच क्षमतेपेक्षा वजन अधिक नोंदवले गेल्यास वाहन चालक यांच्याकडून नोंदवण्यात येणाऱ्या आक्षेपाबाबत अथवा त्या दरम्यान होणाऱ्या संभाषणामुळे वेळ लागत असल्यामुळे मार्गीका अडून राहते. वेगवेगळ्या तांत्रिक बिघडांमुळे दोन्ही दिशेच्या मार्गीकेवरील काही वजनकाटे सदैव बंद राहत असल्याने वाहनांची गर्दी वाढते. अनेकदा मनुष्यबळाची मर्यादा असल्याने तसेच सेवा पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जात नसल्याने काटे बंद राहतात परिणामी वाहनांच्या रांगा वाढत जातात.

मुंबई, भिवंडी, ठाणे परिसरात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेचे निर्बंध लादण्यात आले असून या ठिकाणी वाहने येण्यासाठी तसेच या ठिकाणाहून वाहन गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी नियमन केले जाते. त्यामुळे मुंबईकडून गुजरातकडे जाताना सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत व मुंबईकडे येताना सायंकाळी सहा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत दापचरी येथील वाहन तपासणी नाक्यांवर गर्दी तसेच वाहतूक कोंडी होताना दिसून येते.

दापचारी तपासणी नाक्याच्या दुतर्फा तीन ते पाच किलोमीटर पर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागताना दिसत असतात. तीन पदरी असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एक मार्गीका लहान वाहनांसाठी मोकळी ठेवणे अपेक्षित असताना, अवजड वाहन चालकांच्या बेशीस्तपणामुळे तिन्ही मार्गीकांवर अवजड वाहनांची गर्दी होते. यामुळे लहान प्रवासी वाहने, आपत्कालीन सेवा देणारी वाहने या कोंडीमध्ये अडकताना दिसतात. अनेकदा रुग्णवाहिकांना या वाहन कोंडीचा फटका बसत असल्याने त्यांना विरुद्ध दिशेच्या मार्गीकेवरून प्रवास करावा लागतो.

सध्या अनेक वाहनचालकांकडे वेगवेगळे मोबाईल अँप्लिकेशन असल्याने वाहन कोंडीची माहिती मिळाल्यानंतर अनेक वाहन चालक विरुद्ध दिशेच्या मार्गीकेवरून प्रवास करताना दिसतात. तसेच विशेष अतिअवजड उपकरणे तसेच उंचीला अधिक असणारी वाहने तपासणी नाक्यावरून निघणे शक्य नसल्याने त्यांना विरुद्ध दिशेवरून प्रवेश देऊन हा नाका पार करणे भाग पडते. अशा विशेष वाहनांचा प्रवास नेहमी सुरू असल्याने दोन्ही दिशेला वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याचे प्रकार घडत असतात.

वाहन तपासणी नाक्यावर असणारे सर्व वजनकाटे अहोरात्र सुरू राहतील यासाठी तांत्रिक कर्मचारी तसेच आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ तैनात राहील याची काळजी संबंधित ठेकेदारांनी घेणे आवश्यक आहे. शिवाय वाहनतळापासून दुतर्फा किमान एक किलोमीटर परिसरात एक मार्गीका खुली राहावी यासाठी महामार्ग पोलीस, परिवहन विभाग तसेच वाहन तपासणी नाका चालवणाऱ्या ठेकेदार यांनी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

तपासणी नाक्यावरील ठेकेदार कंपनीने आवश्यकता भासल्यास बॅरिकेड उपलब्ध करणे, वाहनतळ, परिसरात निर्माण होणारे खड्डे किंवा इतर अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद व मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. डिजिटल पद्धतीने शुल्क भरण्यासाठी आग्रह धरणे तसेच काही मार्गीका त्यासाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देणे देखील आवश्यक आहे. तसेच शुल्क आकारणी दरम्यान लागणारे सुट्टे पैसे परत देण्यासाठी मुबलक प्रमाणात त्याची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. वाहनतळाच्या दुतर्फा तीन ते पाच किलोमीटर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून छोट्या वाहनांसाठी राखीव असलेल्या वाहिनीवर आपले वाहन आणून वाहतूक कोंडी करण्यास जबाबदार असणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करण्याची गरज अधोरेखित होत आहे. एकीकडे सध्या महामार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले असताना त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रवास वेळेत वाढ होत असून त्यामध्ये तपासणी नाक्या लगत होणाऱ्या कोंडीमुळे गैरसोय मध्ये भर पडत आहे.