मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. चारोटी जवळ गुजरातकडे जाणाऱ्या दोन मार्गिकेवर काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन पाच ते सहा किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बरेच वाहने उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाल्याने सेवा रस्त्याने जात आहेत त्यामुळे नाशिक डहाणू राज्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेंढवन खिंड, चिल्हार फाटा याही ठिकाणी काँक्रीटीकरण सुरू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. त्यातच सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्या संपत आल्यामुळे गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. या वाहनांही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. तलासरी ते घोडबंदर दरम्यान च्या प्रवासाला साधारणपणे दीड ते पावणेदोन तास वेळ लागत होता परंतू काँक्रीटीकरण सुरू झाल्यापासून याच प्रवासाला तीन ते चार तास वेळ लागत आहे. तलासरी ते घोडबंदर दरम्यान दोन टोल नाके आहेत. महामार्गाच्या काँक्रीटीकरण सुरू असल्याने टोल भरूनही वाहनचालकांना वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडावे लागते तसेच जास्तीचे इंधनही खर्च होते. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करावी अशी मागणी अनेक वाहनचालक करत आहेत.

हेही वाचा… विदर्भात गारपीटीसह पावसाचे तांडव, आणखी दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

तलासरी, चारोटी या ठिकाणावरून अनेक नागरिक महामार्गावरून प्रवास करून वसई, विरार, ठाणे, बोरिवली या ठिकाणी दररोज कामानिमित्त प्रवास करतात. परंतु वाहतूक कोंडी होत असल्याने महामार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक नागरिकांनी महामार्गावरून प्रवास करणे टाळून रेल्वेने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. चारोटी उड्डाणपुलाखालून नाशिक डहाणू राज्यमार्ग जातो. डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी डहाणू येथे शिक्षणासाठी जातात, तसेच अनेक नागरिक सुद्धा कामानिमित्त डहाणू या ठिकाणी जातात. परंतू चारोटी उड्डाणपुलाखालीही वाहतूक कोंडी होत असल्याने डहाणू कडे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिक विद्यार्थी यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

हेही वाचा… आळंदी: छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून योगी आदित्यनाथ यांचा सत्कार

वाहतूक कोंडी होऊनही टोल वसुली सुरूच

महामार्गावरून प्रवास करताना प्रवास जलदगतीने व्हावा, इंधन वाचावे यासाठी टोल घेतला जातो. परंतु महामार्गावर ठिकठिकाणी काम सुरू असल्याने, वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वाहतूक कोंडी मुळे अतिरिक्त वेळ, अतिरिक्त इंधनही खर्च होत आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jams and queues of vehicles due to concreting work of the highway in palghar district asj