उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

निखिल मेस्त्री

Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Private bus accident at Tamhani Ghat 5 dead and 27 injured
ताम्हणी घाटात खाजगी बस अपघात; ५ जण ठार, २७ जखमी
In last two days three accidents on the highway at Uran JNPA and Panvel
उरण, पनवेल जेएनपीए परिसरात कंटेनर अपघातांची मालिका
One killed three injured in Samriddhi Expressway accident after speeding car burst tyres
बुलढाणा : शेगाव दर्शनाची मनोकामना अधुरी! ‘समृद्धी’वर वाहनाचे टायर फुटले; एक ठार, तीन जखमी
navi Mumbai in last few years accident and death decreased
पालिकेच्या परिवहन उपक्रमात अपघातांच्या संख्येत मात्र घट
Dhayari Locality Roads, Pune City Roads Traffic,
पुण्यातील रस्त्याची राष्ट्रपतींनी घेतली दखल! राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या सूचना

पालघर : पालघर जिल्ह्यच्या हद्दीतील महामार्गावर अनेक गंभीर अपघात होत आहेत. अपघातातील गंभीर जखमींवर उपचारासाठी एकही अद्ययावत रुग्णालय उपलब्ध नसल्याने जखमींना मुंबई किंवा गुजरातकडे उपचारासाठी नेताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या जखमींवर तातडीने उपचार व्हावे या उद्देशाने मनोर टाकवहाळ येथे उभारण्यात येणाऱ्या ट्रॉमा काळजी केंद्राचे भिजते घोंगडे कायम आहे. तीन वर्षांनंतरही या रुग्णालयाची काम पूर्ण न झाल्याने अपघाती जखमींना आजही उपचारासाठी वणवण करावी लागत आहे.

महामार्गावर अपघात घडल्यानंतर अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी दिवंगत पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मनोर टाकवहाळ येथे २०० खाटांचे ट्रॉमा काळजी केंद्र रुग्णालय प्रस्तावित केले होते. २०१९ मध्ये या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी ह्य़ा रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गावर ठाणे जिल्ह्यच्या हद्दीपासून ते गुजरात हद्दीपर्यंत एकही अपघातातील जखमींवर उपचार करणारे अद्ययावत रुग्णालय नाही. घोडबंदर ते तलासरी टोलनाक्यापर्यंत आजवर हजारो अपघात घडले आहेत. मात्र रुग्णालय व उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यातच अपघाती रुग्णांसाठी ट्रामा काळजी केंद्र हे अद्ययावत रुग्णालय अजूनही पूर्ण झाले नसल्याने अपघाती जखमींची फरफट सुरूच आहे.

महामार्गावर एखादा अपघात घडल्यानंतर त्यात जखमी झालेल्या अपघातग्रस्ताला तातडीच्या उपचारांची गरज असते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमींच्या शरीराला विविध ठिकाणी इजा झाल्याने हाडतज्ज्ञ, मेंदूतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अभिषक, हृदयतज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांची आवश्यकता भासते. मात्र एकाच ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध असलेले अद्ययावत रुग्णालय अजूनही नाही. त्यामुळे जखमींना उपचारासाठी असे रुग्णालय शोधणे अवघड होऊन बसते. त्यातच गंभीर जखमी असला तर त्याला वाचण्यासाठी रुग्णालयात वेळेत पोहोचविणे अपेक्षित असताना या भागातून इतरत्र रुग्णालयात हलवताना लागणाऱ्या वेळेत रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.

रुग्णालय उभे राहिल्यानंतर विविध आजारतज्ज्ञ येथे रुग्णसेवा देणार आहेत. अपघात विभाग, शवविच्छेदन केंद्र, बा रुग्ण तपासणी विभाग तसेच २० खाटांचे ट्रामा काळजी केंद्र असे विभाग तळमजल्यावर राहणार आहे. वरच्या तळमजल्यात (४स्र्स्र्ी१ ॠ१४ल्ल िऋ’१) आहारगृह, रुग्णालयाचे प्रशासकीय कार्यालय तसेच अद्ययावत शस्त्रक्रियागृह व प्रसूतिगृह अशी रचना ठेवण्यात आली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व चाचणी प्रयोगशाळा ठेवण्यात आली असून या मजल्याच्या काही क्षेत्रांत रुग्ण कक्ष आहेत. दुसरा मजला हा संपूर्णपणे पुरुष व महिला रुग्णांसाठीचे कक्ष आहेत. तिसऱ्या मजल्यावर सभागृह व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी वसतिगृह ठेवण्यात येणार असल्याचे कळते.

रुग्णालयाचे क्षेत्र व सुविधा

रुग्णालयासाठी ७४ कोटींच्या निधीची मान्यता मिळाली आहे. इमारत बांधकाम याकरिता ३३ कोटींचा निधी आवश्यक आहे. उर्वरित निधी इतर सुविधांसाठी वापरला जाणार आहे. रुग्णालयाचे एकूण बांधीव क्षेत्र १९ हजार ६७५ चौरस मीटर आहे. तळमजला व वाहनतळ मिळून २ हजार ५३६ चौरस मीटर क्षेत्र असून त्यातील २५६ चौरस मीटर क्षेत्र वापराखालील असणार आहे. या इमारतीचा तळमजला ३ हजार २६६ चौरस मीटर, पहिला मजला ३ हजार ७६१ चौरस मीटर, दुसरा मजला ३ हजार ७११ चौरस मीटर, तिसरा मजला ३ हजार ७११ चौरस मीटर तर चौथा मजला २ हजार ६०० चौरस मीटर इतका असणार आहे.

मध्यंतरी निधी आला नसल्याने तसेच करोनाकाळामुळे काम थांबले होते. आता काम सुरू  झाले आहे. वर्षभरात इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

विवेक बडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर

Story img Loader