पालघर: १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई येथून चले जाव आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर १४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघर येथील तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमशंकर तेवारी (पालघर), सुकूर गोविंद मोरे (सालवड) तसेच रामचंद्र महादेव चूरी (मुरबे) यांनी इंग्रजांशी लढा देताना हौतात्म्य पत्करले. त्या चौकात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ साली हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला असून दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या पालघर मधील हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आदरांजली सभा आयोजित करण्यात येत. तसेच या निमित्ताने पालघर शहरात बंद पाळला जातो.

दुपारी १२.३९ वाजता आदरांजली वाहण्यासाठी हुतात्म्यांचे कुटुंबीय, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद विषय सभापती, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अधीक्षक बाळासाहेब पाटील इतर लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी बारा वाजता तहसील कार्यालयाजवळील हुतात्मा स्मारकातून हुतात्मा स्तंभापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Ajit Pawar, Ajit Pawar Ganapati Darshan Pune,
पुण्यात अजित पवारांसमोरच वाजली तुतारी…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Ravikant Tupkar, hunger strike,
बुलढाणा : रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; ११ सप्टेंबरला मंत्रालयात बैठक
vasai lawyer association protest
वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
girl molested in kolkata
राज्यात महिला अत्याचारविरोधी कायदा पारित होत असतानाच कोलकात्यात महिलेचा विनयभंग; दोघांना अटक
Power contract workers union hunger strike postponed
ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित
The Kalyan Court rejected the bail application of Shiv Sena Vaman Mhatre badlapur
बदलापूर: वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला
Mahavikas aghadi decision to hold a silent protest across the state to protest the Badlapur sexual assault case Print politics news
मूक आंदोलनातून सरकारची कोंडी? बंदला मज्जाव केल्यानंतर मविआचा नवा पवित्रा

हेही वाचा >>> आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर हुतात्मा दिनाचा थोडक्यात इतिहास

स्वातंत्र्य संग्रामाचे अखेरचे पर्व सुरू झाले ते महात्मा गांधीच्या ‘चले जाव’ च्या घोषणेने. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘‘करेंगे या मरेंगे’’ चा नारा दिला गेला आणि हे लोक गावोगावी पसरले. स्वातंत्र्य संग्रामाच्या या आंदोलनात पालघरचे अनेक देशभक्त नेते आणि तरुण सक्रिय होते. गुप्त बैठकी द्वारे १४ ऑगस्ट १९४२ रोजी मोर्चाचे आयोजन ठरले.

पालघरच्या वळण नाक्यावरून हा मोर्चा निघाला. नेत्यांना अटक झाली होती तरीही आलेवाडी, नवापूर, नांदगांव, सातपाटी, शिरगांव तसेच केळवा, माहीम, वडराई, एडवण येथून आलेल्या ८ ते १० हजारांचा समुदाय निर्धाराने मोर्चाने या आताच्या हुतात्मा स्तंभाजवळ आला. ‘‘साम्राज्य शाहीचा धिक्कार असो’’ अशी सर्वांनी एक मुखाने गर्जना केली. आता मोर्चाला नेता उरला नव्हता. प्रत्येक सैनिकच सेनापती होता. चवताळलेल्या सिंहासारखा त्वेषाने मोर्चा चौकाच्या दिशेने सरकला १५-२० तिरंगी झेंडे पुढे सरसावले. राष्ट्रसेवा दलाच्या मुली आणि मुलांचा समूह या मोर्चात मिसळला. दुपारी १२.३० च्या सुमारास आलमेडा या अ‍ॅग्लो इंडियन अधिकार्‍या ने दिलेल्या उद्धट शिवराळ भाषेमुळे तरुण खवळले.  त्यामुळे पोलीस लाठी हल्ला करीत सत्याग्रहिं वर तुटून पडले. या लाठी हल्ल्याने अनेकजण रक्तबंबाळ झाले व त्यामुळे संतप्त जमावाने दगड विटांनी प्रतिकार केला. हे पाहताच प्रांत ऑफीस शेख यांनी गोळीबाराचा आदेश दिला आणि भीषण नाट्य घडले.

हेही वाचा >>> जव्हार गांधी मैदानाची पार दैना; मुख्यमंत्री दौऱ्यासाठी मैदानावर खडी कपचीचा मारा

लाठी हल्ला सुरू झाला तेव्हा नांदगावच्या सेवादलाचा शाखाप्रमुख गोविंद गणेश ठाकूर आघाडीवर होता. तो चित्त्यासारखा चपळ होता. पोलिसांच्या साखळीतून झटकन झेप घेऊन तो पलीकडे गेला ‘‘वंदेमातरम्’’ अशी गर्जना करीत ध्वज उंच करून पुढे मुसंडी मारण्याचा त्याने प्रयत्न केला. पोलिसांच्या लाठ्यांना त्याने दाद दिली नाही. त्याच्या हातातला राष्ट्रध्वज काढून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण त्यांची पकड घट्ट होती. पण अखेर चक्रविहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी त्याची अवस्था झाली. त्यात अडकलेल्या नव तरुणावर आलमेडाने जवळून गोळी झाडली. तेव्हा ‘‘मरेंगे लेकिन छोडेंगे नही’’ असे ओरडत हातातला ध्वज तसेच घट्ट पकडण्याचे प्रयत्न करीत हा वीर रणात कोसळला. पडताना राष्ट्रध्वज त्यांच्या अंगाखाली येऊन त्याच्या पवित्र रक्ताचे सिंचन त्यावर झाले. आपल्या अभंग राष्ट्र निष्ठेचा ठसाच त्याने राष्ट्रध्वजावर उमटविला.

गोळीबाराने गडबड उडालेली पाहून सातपाटीचा धैर्य निष्ठ युवक काशिनाथ पागधरे हातातला ध्वज उंच धरून चौकाकडे धावला. पोलिसांच्या दिशेने निधड्या छातीने त्याने सरळ चाल केली आणि तद्क्षणी पोलिसांची गोळी काशिनाथच्या कपाळात घुसली. २७ वर्षाचा हा युवक क्षणात धारातीर्थी पड  ला. मृत्यूला वीरासारखे सामोरे जाऊन त्याने आलिंगन दिले. पालघरचा सेवादल सैनिक रामप्रसाद तिवारी केवळ १७ वर्षाचा नवविवाहित तरुण. त्याने धोका पत्करून निधळ्या छातीने दगडविटांनी प्रतिकार केला आणि तो ही धारातीर्थी पडला. रामचंद्र महादेव चुरी यांचे याच ठिकाणी बलिदान झाले. त्यांच्या सर्व कुटुंबानेच स्वातंत्र्यासाठी खूप किंमत मोजली आहे.

सुकूर गोविंद मोरे हा सालवड (शिरगाव) चा तरुण गरीब, अल्प शिक्षित सामान्य मजूर पण परिसरातील जनतेच्या उठावामुळे स्वातंत्र्य प्रेमाचे वारे त्यांच्या अंगी संचारले होते. नवविवाहित पत्नी व लहान मूल यांच्या प्रेमपाशापेक्षा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य त्याला थोर वाटले. सर्वस्वावर पाणी सोडून त्याने देशासाठी हौतात्म्य पत्कारले. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले. गोविंद गणेश ठाकूर यांच्या रक्ताचा सिंचन झालेला हाच ध्वज नंतर पोलिसांच्या नकळत प्रसन्न नाईकने पळवून आणला. प्रती वर्षी आजच्या दिवशी हुतात्मा स्तंभ येथे त्या पवित्र ध्वजाचे पूजन केले जाते. स्वातंत्र्य लढ्यात पालघर तालुक्यातील अनेक नेत्यांनी आणि तरुणांनी तुरुंगवास भोगला आहे.