लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालघर: भाड्याने दिलेली गाडी चोरण्याच्या उद्देशाने पालघर येथील चालक आसिफ घाची यांची हत्या करून पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोघांना पकडण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. या दोघांना २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
भाड्याने नवी कोरी गाडी हवी आहे असे सांगून आसिफ घाची यांच्या माध्यमातून आरोपी एका व्यक्तीची गाडी घेऊन १२ ऑगस्ट रोजी नाशिककडे निघाले होते. असिफ यांची या तिघांनी मोरचुंडी ते त्र्यंबकेश्वर दरम्यान हत्या करून त्यांना रस्त्याकडेला टाकले होते. मात्र आसिफ चा मोबाईल सोबत गाडीमध्ये असल्याने गाडीचे ठिकाण परराज्यात गेल्याचे दिसले होते. या प्रकरणात आरोपींनी पालघर मध्ये त्यांच्या वास्तव्यादरम्यान कोणत्याही प्रकारचा मोबाईलचा वापर न केल्याने आरोपींचा शोध घेणे कठीण झाले होते.
पालघर पोलिस व गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्वतंत्र तुकड्यांच्या मदतीने शोधकार्य हाती आले होते. गुप्त माहिती घराच्या मदतीने एका आरोपीला ओडिसा राज्यात गाडीसह पकडल्यानंतर गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे दुसऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांच्या मदतीने रेल्वे प्रवासादरम्यान ताब्यात घेतल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पालघर पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान पालघर पोलिसांच्या एका तुकडीने पालघर पासून ओडिसा पर्यंतच्या मार्गावर असणाऱ्या सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण (फुटेज) ची पाहणी करून या खून प्रकरणामागील सूत्रधारांचा शोध घेण्यास महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून अहोरात्र काम करत एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या प्रकारातून पालघर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सध्या हे आरोपी परतीच्या प्रवासात असून पालघर मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.