बोईसर – चिल्हार रस्त्यावरील वारांगडे येथील विराज कंपनीच्या धोकादायक वळणावर शुक्रवारी संध्याकाळी भरधाव ट्रेलर व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात टेंपोमधील दोन जण जागीच ठार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वारांगडे येथील विराज कंपनीसमोरील धोकादायक वळणावर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास अवजड ट्रेलरने लहान टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पोमधील चालक आणि क्लिनर दोघेही जागीच ठार झाले. या रस्त्याच्या रुंदीकरणातील त्रुटी वाहन चालकांच्या जिवावर बेतत असून धोकादायक वळणावर अपघातांची मालिका सुरूच असून आत्तापर्यंत शेकडो बळी या मार्गावर गेले आहेत.

हेही वाचा – पालघर: आठ कोटी रुपयांच्या कामामध्ये अनियमितता

हेही वाचा – पालघर : कवडास उन्नई बंधाऱ्याच्या उजव्या कालव्यावर अवलंबून असलेला शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत, रब्बी हंगाम धोक्यात

तारापूर औद्योगिक क्षेत्र व तारापूर अणू ऊर्जा केंद्राला जोडणारा बोईसर चिल्हार हा एकमेव रस्ता असून मालवाहू अवजड, प्रवासी व खाजगी वाहने सुरळीतपणे ये – जा करण्यासाठी एमआयडीसीच्या बांधकाम विभागाकडून कोट्यावधींचा खर्च करून रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्यावरील अपघाती वळणे न काढल्यामुळे अपघात सतत होत आहेत. तर वारंगडे येथील विराज कंपनीच्या समोर असलेल्या वळणावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून या अपघातात अनेक जण मृत्यू पावले असूनही गंभीर दखल घेतली जात नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died in horrific accident on boisar chilhar road ssb