पालघर: पालघर तालुक्यातील बोईसर जवळील कुडण येथे एका अज्ञात इसमाने दोन जेष्ठ नागरिकांचा हल्ला करून दोघांचा खून केला. ही घटना रात्री ९ वाजल्याच्या सुमारास घडली.
खून करणारी व्यक्ती वेडसर असल्याचे अंदाज व्यक्त केला जात असून गेल्या दोन दिवसांपासून तो गावात फिरत होता. पोलीस घटना स्थळी पोहचत असून खून करणारी व्यक्ती झुडपात पसार झाल्याने त्याचा शोध घेतला जात आहे.
हल्ला कुदळ सरख्या तिक्ष्ण वस्तूने डोक्यावर हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. पहिला खून केल्याचे घरातील भावाने पाहिल्यानंतर खुनी ने दार तोडुन दुसऱ्या भावाचा खून केला अशी माहिती पुढे आली आहे. मृतांची भावांची नाव: भीमराव पाटील (७२) मुकुंद पाटील (८०)