पालघर : देहाळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील दोन महिला देहाळे जवळील नदीत पहाटेच्या वेळी मासे पकडण्यासाठी गेल्या असता पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यात वाहून गेल्या. दोन्ही महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये गंगी करबड (वय ४५) आणि गुलाबी दांडेकर (वय ५५) यांचा समावेश आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नदी, ओढे, नाले यामध्ये मासेमारी केली जाते. पहाटेच्या वेळेस नदीपात्रात खेकडे, चिंबोऱ्या मिळतात. त्यामुळे अनेक नागरिक घरी खाण्यासाठी मासे, खेकडे पकडायला जातात. देहाळे येथील दोन महिला आज पहाटे मासे पकडायला गेल्या असताना मुसळधार पाऊस सुरू असल्याने अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. या प्रवाहामध्ये दोन्ही महिला वाहून गेल्या.

buffaloes dies due to lightning strike in dam
पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
Two brothers drowned, Nandurbar taluka,
नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता

हेही वाचा – Dahi Handi 2023: मुख्यमंत्र्यांचा भरगच्च कार्यक्रम, दिवसभरात ३१ मंडळांना देणार भेटी; फडणवीसांची ८ ठिकाणी हजेरी!

हेही वाचा – Zilla Parishad Recruitment: जिल्हा परिषद भरतीत अर्जांचा पाऊस; वाशीम जिल्ह्यातील २४२ पदांकरिता तब्बल ‘इतके’ अर्ज

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोन्ही महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील गंगी करबड या महिलेचा मृतदेह खानीव गावाच्या हद्दीत सकाळी ९ वाजल्याच्या आसपास नदीपात्रात आढळून आला, तर दुसरी महिला गुलाबी दांडेकर हिचा मृतदेह तपास सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चारोटी जवळील पुलाजवळ सापडला. पाऊस असल्याने नागरिकांनी नदीपात्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.