पालघर जिल्ह्यात विक्रमगड जव्हार व मोखाडा तालुक्यात काल रात्री मुसळधार पावसाच्या दोन सरी झाल्याने आंबा, काजू, तृणधान्य तसेच वीट भट्ट्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील अधिकतर भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.
शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास जव्हार, विक्रमगड येथे मुसळधार तर वाडा, मोखाडा व तलासरी भागात किरकोळ स्वरूपात पाऊस झाला. या पावसामुळे फळ पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वातावरणामुळे शेती, बागायती, भाजीपाला वर रोगराई पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.