पालघर : जिल्ह्य़ात पडणाऱ्या पावसाची नोंद जिल्हा प्रशासनासह राज्य शासनही करीत असते. परंतु या नोंदीच्या आकडेवारीत तफावत असल्याचे आढळून येत आहे. शासनाच्या महारेन या संकेतस्थळावरील आणि जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत १५ टक्क्य़ांचा फरक आहे.  पीक विमा योजनेसाठी ही आकडेवारी ग्राह्य़ धरली जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

सर्वासाठी खुल्या असलेल्या राज्य शासनाच्या महारेन या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यापर्यंत सर्वसाधारणपणे होणाऱ्या १३१७ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत १ ऑगस्टपर्यंत २०५८ मिलिमीटर (१५६ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. महारेन अनुसार जिल्ह्यत सरासरी २३०५  मिलीमीटर पावसाची नोंद असून १ ऑगस्टपर्यंत हंगामाच्या सरासरीच्या तुलनेत ८९ टक्के पाऊस झाल्याचे दर्शवित आहे. ही माहिती कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून देखील शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यत ३१ जुलैपर्यंत सरासरी १३१६.९० मिलीमिटर पाऊस पडतो. यावर्षी २०५८.१० मिलीमीटर (१५६.३० टक्के) इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
low pressure belt, Bay of Bengal,
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?
Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
imd warned vidarbha and marathwada of heavy to very heavy rain for two more days
पावसाचे संकट आणखी गडद होणार!; वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह…
Solapur, fake doctors, municipal administration, Tukaram Mundhe, Maharashtra Medical Practitioners Act, fake doctors in Solapur, Solapur news, latest new
सोलापुरात तोतया डॉक्टरवर महापालिका प्रशासनाची कारवाई, जिल्ह्यात २५० तोतया डॉक्टर असण्याचा अंदाज
PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होणारी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून वितरित करण्यात येत असून या माहिती स्रोतांनुसार जिल्ह्यत सर्वसाधारणपणे २४१६ मिलीमिटर पावसाची नोंद  असून १ ऑगस्टपर्यंत १७२९ (७२ टक्के) पावसाची नोंद झाल्याचे दर्शवण्यात आले आहे. शासकीय विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या पर्जन्यमानाच्या माहितीमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण  आहे. शासनाच्या पीक विमा योजनेसाठी कमी पर्जन्यमान असणाऱ्या आकडेवारीचा वापर होईल अशी शक्यता असून विमा कंपन्यांच्या लाभासाठी वेगवेगळी आकडेवारी प्रसिद्ध होत असल्याचे शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे.

 भारतीय हवामान विभागाद्वारे २०२१ पासून मौसमी हंगामाच्या  प्रत्येक महिन्याचा अंदाज देण्यात येतो. त्यानुसार ३१ जुलै रोजी प्रसारित हवामान अंदाजानुसार येत्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात  देशात सरासरीच्या ९६- १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील बहुताश जिल्ह्यसह पालघर जिल्ह्यत सुद्धा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विस्तारीत श्रेणी हवामान अंदाजानुसार ४-१० ऑगस्ट आणि ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ऑगस्ट महिन्यात पालघर जिल्ह्यतील कमाल व किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

महारेनची आकडेवारी अंतिम

पालघर जिल्ह्यत मंडळ कार्यालय निहाय पर्जन्यमानाचे मोजमाप होत असून त्याची आकडेवारी जिल्हा स्तरावर प्रथम प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानंतर हवामान विभागाकडून प्राप्त होणारी माहिती प्रसिद्ध केली जाते. मात्र जिल्ह्यचे आकडेवारीकरिता महारेनची आकडेवारी अंतिम असून पर्जन्यमान मोजमाप केंद्राच्या ठिकाणानुसार त्यामध्ये काही प्रमाणात तफावत असणे साहजिक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भगाडे त्यांनी सांगितले.

पुढील कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे महारेन संकेतस्थळावरील माहिती देण्यात येईल, असेही ते  म्हणाले. असे असले तरी कृषी संदर्भातील विमा योजनांकरिता ‘महावेध’ यंत्रणेची आकडेवारी अंतिम मानली जात असून ही माहिती सर्व सामान्य शेतकरी बागायतदार यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जिल्ह्यत व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे.