पालघर: राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्तरावरील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २ ऑक्टोबर पासून डॉ. स.दा. वर्तक विद्यालय बोईसर येथे सुरू होणार आहेत. या स्पर्धेसाठी बीड वरून बोईसर येथे उपस्थित झालेले आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू शकील अहमद (उंची ७ फूट २ इंच) यांच्यासोबत पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय सुहास व्हनमाने, डेरेल डिमेलो, प्रमोद पाटील, प्रकाश वाघ, राम पाटील, संजय पाटील, जबीर खान, आशिष पाटील, नरेंद्र घरत, समीर पिंपळे, राजेंद्र सांबरे पाटील आदी उपस्थिती होते.
बोईसर मध्ये सोमवार पासून सुरू होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे खास आकर्षण…
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २ ऑक्टोबर पासून डॉ. स.दा. वर्तक विद्यालय बोईसर येथे सुरू होणार आहेत
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 01-10-2023 at 22:32 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Volleyball tournament starting in boisar zws