नितीन बोंबाडे
सन १९३२ पासून मागणी असलेल्या डहाणू ते नाशिक असा १५५ कि.मी. चां रेल्वे मार्ग प्रस्ताव संबंधी केंद्रीय रेल्वे मंत्री अष्टिद्धr(२२८)नी वैष्णव यांना दिल्ली येथील कार्यालयात, भेटून भौगोलिक विकास घडवून मंजूर करणें बाबत निवेदन देण्यात आले. रेल्वे मंत्री आष्टिद्धr(२२८)न वैष्णव यांनी डहाणू नाशिक रेल्वे मार्गासाठी २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने रेल्वे मार्ग प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. डहाणू ते नासिक रेल्वे मार्गाचे महत्व आणि भौगोलिक माहिती पटवून दिली असता याबाबत पुनर्विचार करण्याची आश्वसन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन १९३२ मध्ये ब्रिटीश सरकारच्या राजवटींत डहाणू ते नाशिक रेल्वे मार्गाची मागणी आहे. या मार्गात डहाणू ते नाशिक १५५ कि.मी. अंतराच्या पट्टया पालघर, ठाणे, नाशिक असे तीन जिल्ह्यंत मोडत असून मुंबई नजिक असल्याने, मुंबईकरांनाही दळणवळणासाठी दिलासा मिळेल. यावेळी पालघर जिल्हा भाजप गुजराती सेलचे अध्यक्ष भविन पारेख, कार्यालय सचिव हरेश मर्दे, दिनेश मर्दे, आकाश सिंग उपस्थित होते.

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र डोंगर-रांगा यामुळे ही मागणी दुर्लक्षित राहिली आहे. डहाणू नाशिक रेल्वे मार्ग सुरू झाल्यास शिक्षण, रोजगार, नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. तसेच दळणवळणामुळे औद्य्ोगिक, कृषी, पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकेल. डहाणूचे प्रसिद्ध चिकू, सुकी मासळी, नाशिकची द्राक्ष, भाजीपाला यांची मोठी मागणी असते. त्यामुळे डहाणू नाशिक रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सन १९३२ साली केलेल्या डहाणू ते नाशिक रेल्वेची मागणी सन १९५२ च्या पहिल्या लोकसभेपासून डहाणू ते नाशिक रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने झालेली आहे. सन १९५२ मध्ये तात्कालीन खासदार नंदकर आणि सन १९५७ च्या लोकसभेत जव्हारचे खासदार व राजे यशवंतराव मुकणे यांनी त्या मागणीसाठी लोकसभेंतही आवाज उठविलेल होते, तथापि स्वातंत्र्य पूर्व काळांत जव्हारचे ताकालीन राजे मार्तंडराव मुकणे यांनी नाशिक— डहाणू रेल्वे मार्गाची सर्व प्रथम ब्रिटीस सरकारकडे मागणी केलेली आहे. सन १९६२ ते २००९ पर्यंत लोकसभेंत सर्व पक्षिय खासदारांनी उपरोक्त डहाणू ते नासिक रेलवे मार्गाची मागणी लावून धरली.माजी खासदार कै. दामू शिगडा, माजी खासदार कै. शंकर नम, माजी खासदार कै. चिंतामण वनगा तसेच अनेकांच्या यांत समावेश होता.