पालघर : बोईसरजवळील नवापूर गावामध्ये काँक्रीट रस्त्यांची उभारणी करण्यात आली असून रस्त्याची उंची वाढल्याने रस्त्यालगत असणाऱ्या अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. या रस्त्यालगत पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पूर्ववत असणारा पाण्याचा नैसर्गिक मार्ग कायम ठेवावा तसेच गटार व्यवस्थेची उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २०२०-२१ या वर्षांत नवापूर बाजार ते शेट्टे स्टॉप या भागात रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र त्यालगत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेली गटार व्यवस्था उभारण्यात आली नसल्याने मुसळधार पाऊस झाला की पावसाचे पाणी लगतच्या काही घरांमध्ये शिरते.

काही ग्रामस्थांनी गटार उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने स्वत:च्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र या विषयी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष दिले नसल्याने या भागात आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.

समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या या गावात पूर्वापार पाण्याचा निचरा होण्याचा नैसर्गिक मार्ग पूर्ववत करण्यात यावा तसेच पाण्याच्या मार्गावर झालेले अतिक्रमण किंवा अडथळे दूर करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या समस्येकडे काही ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी स्तरावर निवेदने दिली आहेत.