परिसरातील शेती धोक्यात; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
पालघर : पालघर येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या लगत असणाऱ्या जे.पी. उद्योगनगर येथील काही रासायनिक उत्पादने करणाऱ्या कारखान्यातून सांडपाणी उघडय़ावर सोडले जात असल्याने लगतच्या भागातील शेती धोक्यात आली आहे. तर परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याची समस्यादेखील निर्माण झाली आहे.
पालघर पूर्वेकडील रेल्वे उड्डाण पुलाला लगतच्या भागात असलेल्या काही उद्योगांमधून सांडपाणी विनाप्रक्रिया उघडय़ावर सोडले जात आहे. या सांडपाणी वाहून नेणारे गटार कमी उंचीचे व कच्च्या स्वरूपाचे आहे. ते मोडकळीस आलेले आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर व लगतच्या शेतजमिनीवरील शिरत आहे. भाजीपाला व फळ उत्पादनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. तर कूपनलिकांचे पाणीदेखील रसायनमिश्रित येत आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य व आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे.
उघडय़ावर सोडल्याा जाणाऱ्या सांडपाण्यामुळे तसेच पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची दिशा बदलल्याने दरुगधीयुक्त पाणी शेतात साचून डासांची पैदास होण्यास कारणीभूत ठरत आहे. परिसरात नागरी वस्ती असून दूषित पिण्याचे पाणी, दुर्गंधी तसेच डासांमुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी या संदर्भात ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.