पालघर : वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीच्या डबल डेकर च्या आयुर्मान संपुष्टात येत असल्याने तसेच या पद्धतीचे डबल डेकर डबे उपलब्ध नसल्याने या गाडीला ५ जानेवारी २०२५ पासून इतर एक्सप्रेस, शटल व पॅसेंजर गाडी प्रमाणे डबे जोडण्या चा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने अंतिम केला आहे. या प्रस्तावात वलसाड, सुरत, बडोदा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्याचे आयसीएफ कंपनी ने उत्पादित रेक आलटून पालटून साखळी पद्धतीने वापरण्याचे योजिले असून काही पॅसेंजर गाड्यांचे गंतव्यस्थान व थांबे बदलण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत.

सध्या ११ डबल डेकर डबे असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर ला एकूण १८ डबे असून नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला रचनेत ही गाडी २२ डब्यांची करून त्यामध्ये १५ सिंगल डेकर डबे, तीन वाईस फर्स्ट क्लास व प्रत्येकी दोन मालवाहू डबे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा बदल ५ जानेवारी पासून करण्याची प्रस्तावित असून या संदर्भातील अधिसूचना प्रसारित झाली आहे.

Navi Mumbai Metro update Belapur Pendhar line Metro speed
नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
number of coaches of two Konkan Railway trains has increased Mumbai print news
कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांचे डबे वाढले
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
thane creek bridge 3 loksatta news
ठाणे खाडी पूल ३ : दक्षिणेकडील मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात, फेब्रुवारीअखेरीस मार्गिका वाहतूक सेवेत
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Mumbai tuesday 28th january central railway harbour railway Trains delayed
मुंबई : रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, ८ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ, प्रवासात नियोजित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटांची भर
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द

हेही वाचा…पालघरकरांनी रिचवले अकराशे कोटींचे मद्य, अकरा महिन्यांत ३ कोटी १७ लीटर मद्याची विक्री

वलसाड फास्ट पॅसेंजर च्या डब्यांच्या रचनेत बदल करताना या गाडीचा रेक चा वापर वापी पॅसेंजर, वलसाड मुंबई फास्ट पॅसेंजर, वलसाड भरूच एक्सप्रेस, बलसाड विरार एक्सप्रेस, विरार सुरत शटल, सुरत विरार शटल व विरार वलसाड शटल या गाड्यांसाठी आलटून पालटून करण्याचा विचाराधीन आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे डब्यांचे रचना व त्यांची संरेखन एकाच पद्धतीची ठेवण्याची पश्चिम रेल्वे प्रयनशील आहे.

या सुधारित रचनेमुळे ५९०२४ वलसाड मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर, ५९०२३ मुंबई सेंट्रल बलसाड फास्ट पॅसेंजर गाडी ची एक फेरी मुंबई सेंट्रल ते वापी (५९०४५) व वापी ते मुंबई सेंट्रल (५९०४६) अशी वाढविण्यात आली आहे. याच गाडीचा रेक वलसाड बडोदा एक्सपरीस (५९०४९), बडोदा बलसाड एक्सप्रेस (५९०५०), वलसाड विरार शटल (५९०४०), विरार सुरत शटल (०९००१), सुरत विरार शटल (०९००२) व विरार वलसाड शटल (५९१०३९) या गाड्यांच्या करिता वापण्यात येणार आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर, वलसाड बरोदा पॅसेंजर तसेच विरार सुरत शटल या गाड्यांच्या दोन्ही दिशेच्या प्रवासाच्या वेळेमध्ये व थांबांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.

या नव्या रचनेमुळे गेल्या अनेक वर्ष मुंबई सेंट्रल यार्डात दिवसभर उभी राहणारा वलसाड फास्ट पॅसेंजर चा गाडी ही साखळी पद्धतीने इतर गाड्यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे दिसून आले आहे. डब्यांच्या कमतरतेमुळे अशा पद्धतीची गाडीची रचना व वेगवेगळ्या तीन -चार गाडींचे कोच चा वापर पश्चिम रेल्वेने विचाराधीन घेतले आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रवासी संघटनांनी दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे.

हेही वाचा…विवळवेढे उड्डाणपुलावर भीषण अपघात ; टँकर मधून रसायन गळती

काही गाड्यांच्या वेळेत होणार बदल

५९०४५ बांद्रा टर्मिनस वापी पॅसेंजर ही गाडी ५ जानेवारी पासून बांद्रा टर्मिनस ऐवजी मुंबई सेंट्रल येथून सकाळी ०९.५५ वाजता सुटणार असून या गाडी चे अंधेरी, भाईंदर, वसई, वैतरणा, केळवा रोड, वाणगाव, बोर्डी रोड व करंबेली येथील थांबे रद्द करण्यात आले आहेत. हे थांबे रद्द करण्याच्या बदल्यात आठवड्यातून पाच दिवस (शुक्रवार व शनिवार व्यतिरिक्धा) धावणाऱ्या बांद्रा टर्मिनस उधना (०९०५५) या गाडीला पॅसेंजरच्या वेळेत व वगळलेले थांबे देण्यात येणार आहेत.

तसेच ५९०४६ ही गाडी वलसाड येथून बांद्रा टर्मिनस दरम्यान धावण्याऐवजी विरार पर्यंतच चालविण्यात येणार असून या गाडीचे अतुल, पारडी, उधवा, करंबेली, भिलाड, संजाण, उंबरगाव, बोर्डी रोड, घोलवड, डहाणू रोड, वाणगाव, केळवा व वैतरणा हे थांबे रद्द करण्यात आले आहे. ही गाडी वापी, बोईसर, पालघर व सफाळे येथे थांबेल. मात्र जुन्या पॅसेंजर च्या वेळेत व सर्व थांबे घेत आठवड्यातून पाच दिवस (गुरुवार व शुक्रवार वगळता) धावणारी उधना- बांद्रा टर्मिनस पॅसेंजर (०९०५६) धावणार आहे. तर ५९०४० वापी विरार शटल गाडीला बोरिवली येथे थांबा देऊन मुंबई सेंट्रल पर्यंत विस्तारित करण्यात आले आहे.

उधना बांद्रा टर्मिनस पॅसेंजर आठवड्यातून दोन दिवस धावत नसल्याने सायंकाळी कामावरून विरार मुंबईकडे घरी परतणाऱ्या नागरिकांचे व कामगार वर्गाचे हाल होणार आहेत. तसेच दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पाच मिनिटाच्या अंतरावर पालघर व बोईसर येथील प्रवाशांना विरारच्या दिशेने दोन गाड्या उपलब्ध राहणार आहेत.

हेही वाचा…पालघर : आदिवासी बालिकेवर विनयभंग, ५४ वर्षीय इसमावर पॉक्सो

प्रवाशांचे होणार हाल

वलसाड फास्ट पॅसेंजर चे डब्यांची संख्या १८ वरून २२ वर वाढविणे ही समाधानाची बाब असली तरी सुद्धा नव्याने जोडण्यात येणाऱ्या आयएफसी कोचची आसनक्षमता व उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मर्यादित असल्याने या नवीन रचनेत नागरिकांना गैरसोळीला सामोर जावे लागेल अशी शक्यता आहे. यापूर्वी डबल डेकर डब्यात ऐवजी एलएचबी पद्धतीचे डबे बसविण्याचे प्रस्तावित केले असताना डबल डेकर च्या वरच्या व खालच्या भागातून प्रवास करणाऱ्या दैनंदिन (एमएसटी) प्रवाशांनी डब्याच्या दोन भागात विभागणी केली होती. मात्र आता आयसीएफ कोच दिले गेल्याने पुढील काही दिवस प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader