पालघर : मुसळधार पावसाच्या शक्यतेवर सावधगिरीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने रविवारी २ जुलै रोजी आपल्या २६ सेवा अचानकपणे शनिवारी सायंकाळी उशिरा रद्द केल्याची घोषणा केली. हवामान विभागाचा तसेच शासनाचा कोणत्याही प्रकारचा सतर्कतेचा इशारा नसताना पश्चिम रेल्वेने कोणत्या माहिती स्रोताच्या आधारे हा निर्णय घेतला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालघर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत अनेक ठिकाणी लखलखित ऊन व किरकोळ पावसाच्या सरी झाल्याने गैरसोय होणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

पश्चिम रेल्वेने शनिवारी सायंकाळी उशिरा पाठवलेल्या ई-मेलद्वारे मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मेमू सेवेच्या आठ फेऱ्या, शटल गाडीच्या सहा फेऱ्या तसेच १२ उपनगरीय सेवा रद्द करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे आज बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले. असे असताना लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या व मालगाड्या सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले.

vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?

हेही वाचा – अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हवामान विभागाने मुंबई, पालघर व ठाणे जिल्ह्यात आजच्या दिवशी तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी के. एस होसालीकर यांनी पश्चिम रेल्वेने गाड्या रद्द करण्यासाठी घेतलेला मुसळधार पावसाचा आधार चुकीचा असल्याचे ट्विटदारे नमूद केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या चुकीच्या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त करत गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र याबाबत कोणताही बदल होऊ शकला नाही.

हेही वाचा – पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर, पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

आज दिवसभर पालघरसह अनेक भागांत काही लख्ख सूर्यप्रकाश पडला होता, तसेच दिवसभरात पावसाच्या किरकोळ सरी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याची टीका रेल्वे प्रवाशांकडून केली जात असून यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. अनेक गाड्या रद्द असल्याने नंतरच्या गाड्यांना गर्दी पसरली होत. या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणात माहिती घेऊन कळवतो, असे त्यांनी सांगितले.