पालघर : भारत निवडणूक आयोगाने जनता दल (युनायटेड) या पक्षाला शिट्टी चिन्ह राखीव ठेवण्याबाबत ३० जानेवारी २०२४ रोजी जारी केलेले पत्र मागे घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह खुले चिन्ह म्हणून मानले जाणार आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी पक्षासह इतर अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी हे चिन्ह उपलब्ध होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या पत्रामधून आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिली होती. मात्र त्यानंतर २३ मार्च २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेत शिट्टी हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Congress Candidates List
Congress Candidates List : मविआच्या जागा वाटपात काँग्रेस शंभरी पार, सम-समान फॉर्म्युल्यावर प्रश्नचिन्ह!
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maha Vikas Aghadi finalises seat sharing for Maharashtra
अखेर मविआचे ठरले! काँग्रेस १०५, ठाकरे ९५, शरद पवार ८५
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?

या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन दाखल करण्याच्या प्रक्रिये बहुजन विकास आघाडी पक्षाच्या उमेदवारांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी शिटी या चिन्हाची मागणी केली होती. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे भारत निवडणूक आयोग आला ३१ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून शिट्टी या चिन्हाचा आगामी निवडणुकी वापर करण्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. मात्र भारत निवडणूक आयोगाने शिटी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आल्याने इतर कोणत्याही स्थानिक पक्ष अथवा अपक्षांना देण्यात येऊ नये असे सूचित केले होते.

हेही वाचा >>> Ambernath Assembly Constituency : अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांच्या अडचणीत वाढ

या संदर्भात लोकसत्ता मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयातील सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित (रिट) याचिका दाखल केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उद्या (४ नोव्हेंबर रोजी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. या विषयाचे गांभीर्य पाहून या याचिकेची सुनावणी उद्या सोमवारी सकाळी होणार आहे. या याचिकेत बहुजन विकास आघाडीने भारत निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०१४ रोजी जारी केलेल्या पत्र व त्यामुळे झालेल्या परिणामांबाबत हरकत घेतली होती आहे.

हेही वाचा >>> शिटी साठी बविआ ची उच्च न्यायालयात धाव

दरम्यान भारत निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी जनता दल (युनायटेड) ला शिटी हे चिन्ह राखीव ठेवण्याबाबतचे पत्र मागे घेतल्याचा संदेश राज्य निवडणूक विभागाकडे प्राप्त झाला असून त्यामध्ये शिटी हे चिन्ह खुले झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे निवडणूक चिन्ह वाटपाच्या नियमांनुसार विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांना यांना प्राधान्यक्रमाने या चिन्हाचा वापर करणे शक्य होणार आहे.