वाडा : वाडा तालुक्यात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अबिटघर येथील एका कारखान्यात पट्टय़ात हात अडकल्याने  कामगाराचा मृत्यू झाला. अबिटघर येथील सनशाइन पेपर टीच नावाच्या पुठ्ठा कंपनीत अनिकेत खांजोडे (१८) हा तरुण वडिलांसोबत वर्षभरापासून काम करीत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

याबाबत कंपनी व्यवस्थापक राहुल फणसे यांना विचारणा केली असता हा तरुण कंपनीत काम करीत नसून तो वडिलांसोबत आला होता असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत वाडा पोलीस स्टेशनमध्ये कंपनी ठेकेदार धनराज धनगर ऊर्फ बाळासाहेब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. झालेल्या अपघातात अनिकेत खांजोडे (वय १८) या तरुण कामगाराचा मृत्यू झाला. तो स्थानिक अबिटघर मानाचा पाडा येथील रहिवासी होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांसोबत हा तरुण वर्षभरापासून येथे काम करीत होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काम करीत असताना अचानक पट्टय़ात त्याचा हात अडकून अपघात झाला. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या अनिकेतला रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत कंपनी व्यवस्थापक राहुल फणसे यांनी  तरुण कंपनीत काम करीत नसून तो वडिलांसोबत आला होता असे त्यांनी स्पष्ट केले.  वाडा पोलीस ठाण्यात कंपनी ठेकेदार धनराज धनगर ऊर्फ बाळासाहेब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Story img Loader