बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात रात्र पाळीवरील कामगार गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून. मयत कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. कुटबियांनी मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जिंदल स्टील वर्क्स (जे एस डब्लु ) या कारखान्यातील देखभाल दुरुस्ती विभागात रात्र पाळी मध्ये काम करणाऱ्या मनोहर भास्कर वाणी (४५) या देह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने मृताचे कुटुंबीय आणि पोलीस यांना दिल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. मात्र मृताच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून सर्व प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने जोपर्यंत याची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा… बोईसर : नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी; ग्रामस्थ संतप्त

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : अजित पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार, ठाकरे गटाचा मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा; म्हणाले, “३१ डिसेंबरला…”

या प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worker suicide in one of factory of tarapur family alleges suspicious death asj