-
अवघ्या काही महिन्यांवर वर्ल्डकप येऊन ठेपलेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. युती, आघाडी, महागटबंधन यांच्या चर्चा, आरोपप्रत्यारोपांच्या फैरी असे एकंदरित राजकीय वातावरण गल्लीपासून दिल्लीपर्यंत तयार झाले आहेत. प्रत्येकजण निवडणुकींबद्दल आपले मत व्यक्त करताना दिसत आहे. अनेकजण आपल्या आवडत्या नेत्याला तसेच पक्षाला शक्य त्या पद्धतीने पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत. अगदी झेंड्यांपासून, मोबाइल कव्हर आणि टी-शर्ट्सपर्यंत सर्वच माध्यमातून मतदार आपल्या आवडत्या नेत्यांचे समर्थन करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमिवर आता पंतप्रधान मोदींच्या महिला सर्थकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दादरमधील एक प्रसिद्ध साडी उद्योजकांनी पंतप्रधान मोदींचा फोटो असणारी साडी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बाजारात आणली आहे. इंडियन एक्सप्रेसचे फोटोग्राफर प्रशांत नाडकर यांनी या साडीची झकल आपल्या कॅमेरामधून टिपली आहे. चला तर मग पाहुयात कशी आहे ही मोदी साडी…
-
निवडणुकांमध्ये २०१४ प्रमाणे मोदी लाट असेल किंवा नाही हे येणार काळच सांगेल मात्र फॅशन जगतावर निवडणुकांआधीच नरेंद्र मोदींची लाट आलेली दिसतेय.
-
या साडीच्या पदरावर पंतप्रधान मोदींचा फोटो आहे
-
पंतप्रधानांच्या औपचारिक नमो अॅपवर मोदींचे फोटो असलेले अनेक मर्चंडाइज मिळतात. मात्र या साडीच्या माध्यमातून भारतीय पेहरावावर पहिल्यांदाच मोदींचा फोटो फ्रिंट पहायला मिळत आहे.
-
सातत्याने चर्चेत असणाऱ्या मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेण्यासाठी पुन्हा एकदा मोदी साडी मुंबईतील बाजारात
-
लग्नसराईच्या दिवसांना आता सुरुवात झाली आहे. बाजारात शालू, पैठणी यासारख्या भरजरी साड्यांना लोक पसंती देत आहेत. त्यातच ही मोदी साडी अनेक महिलांना भूरळ पाडताना दिसत आहे.
-
पंतप्रधान मोदींची क्रेझ पाहता याचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
याआधी नोटबंदीनंतरच्या काळातही पंतप्रधान मोदींच्या फोटो असणारी मोदी साडी दादरमधील दुकानांमध्ये उपलब्ध होती.
-
दादरमधील बाजारात ही साडी उपलब्ध आहे.
-
मुंबईसह इतरही ठिकाणाहून या साडीला मागणी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
-
दादरमधील पाणेरी या दुकानात ही साडी महिलांना विकत घेता येईल.
-
पंतप्रधानांच्या फोटोची प्रिन्ट असलेलेी ही साडी आपल्या कलेक्शनमध्ये ठेवण्यास हरकत नाही.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख