लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. यंदा कलाविश्वातील काही अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अभिनेत्री मिमी चक्रवर्ती पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढविणार आहे. पश्चिम बंगालमधील जादवपूर येथून मिमी या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यावेळी उत्तर प्रदेशमधील मथुरा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. शताब्दी रॉय या पश्चिम बंगालमधील बीरभूम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. -
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा उत्तर प्रदेशमधील रामपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. चित्रपटसृष्टीतील नावाजलेला चेहरा म्हणजे मुन मुन सेन यावेळी पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख