काँग्रेसच्या के सी पाडवी यांचा हिना गावित यांनी तब्बल 95 हजार 629 मतांनी पराभव केला आहे. उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबार मतदार संघातून हिना गावित यांनी सहा लाख 39 हजार 136 मते घेत दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासीबहुल आहे. यावेळी ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. एकूण मतदानाच्या 49.86 टक्के मते हिना गावित यांना तर 42.4 मते पाडवी यांना मिळाली आहे. गावित यांना 1910 पोस्टल मते मिळाली तर पाडवींच्या पदरी 1577 पोस्टल मते पडली आहेत.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख