-
प्रियंका गांधी आणि राहुल गांधी लहानपणी शाळेत गेले होते, पण नंतर दोघांचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि युपीच्या काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
-
प्रियंका गांधी ‘द लॅलनटॉप’ शोमध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होत्या आणि त्यादरम्यान त्यांनी त्यांचे आणि राहुलचे नाव शाळेतून का काढले, याबद्दल सांगितले.
-
प्रियंकांनी सांगितले की, त्यांच्या आजीची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्या त्यांच्यासोबत राहायच्या.
-
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना कार्यकाळात राजीव गांधीही सोनिया आणि राहुल-प्रियंका यांच्यासोबत इंदिरा गांधींसोबत राहत होते.
-
प्रियंका गांधी यांनी सांगितले होते की, आजीच्या हत्येवेळी मी १२ वर्षांची होते. त्याच्या हत्येनंतर त्या आणि राहुल शाळेत जाणार नाहीत, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता.
-
प्रियंकानी सांगितले की, १२ ते १८ वर्षांपर्यंत त्यांचे आणि भाऊ राहुलचे सर्व शिक्षण घरीच झाले. त्यांचा शाळेशी संपर्क तुटला होता.
-
प्रियंकानी सांगितले की, त्या आणि राहुल घरीच राहायचे. ते एकमेकांचे मित्र आणि भावंड होते.
-
प्रियंकानी या मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या लहानपणी त्या राहुलसोबत भांडायच्या आणि भांडणात नेहमीच राहुल गांधी जिंकायचे.
-
(फोटो – सोशल मीडिया आणि पीटीआय)
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का