-
UP Elections: गोव्यात मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकरांना तिकीट न दिल्याने चांगलंच राजकारण तापलं आहे. पण भाजपाने फक्त गोव्यात नव्हे तर उत्तर प्रदेशातही भाजपा नेत्यांच्या अनेक मुलांना तिकीट दिलेलं नाही. तिकीट मागणाऱ्या भाजपा नेत्यांच्या या मुलांच्या हाती निराशा आली आहे. पाहूयात कोण आहेत हे नेते…
-
भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी लखनऊ कँटमधून मुलगा मयंकसाठी तिकीट मागत होत्या. पण पक्षाने मयंक जोशी यांच्या जागी बृजेश पाठक यांना उमेदवारी दिली आहे.
-
युपी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे मोठे नेते ह्रदय नारायण दीक्षित आपला मुलगा दिलीप दीक्षितसाठी उन्नावच्या पुरवा मतदारसंघातून तिकीट मागत होते. भाजपाने येथून अनिल सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
-
कानपूरमधील गोविंद नगर मतदारसंघातून भाजपाचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी आपला मुलगा अनुपसाठी तिकीट मागितली होती. मात्र पक्षाने येथून सुरेंद्र मैथानी यांना तिकीट दिलं.
-
योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राजेश अग्रवाल बरेलीमधील कँट मतदारसंघातून मुलगा आशिषसाठी तिकीट मागत होते. पण भाजपाने संजीव अग्रवाल यांना तिकीट दिली आहे.
-
भाजपा खासदार कलराज मिश्रा यांनी आपला मुलगा अमित मिश्रासाठी देवरिया मतदारसंघातून तिकीट मागितली होती. पण भाजपाने त्यांना तिकीट नाकारलं.
-
(PHOTOS: Social Media)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना