-
अपर्णा यादव यांनी आता भाजपात प्रवेश केलाय. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की त्याआधी मुलायम सिंह यादव यांनी स्वतः आपल्या दोन्ही सुनांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकिट न देण्याचा निर्णय घेतला होता? अखिलेश यादव यांनी एका मुलाखतीत याची माहिती दिलीय. त्यामुळे सपा आपल्या सुनांना निवडणुकीपासून दूर का ठेवत आहे याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
२०१७ मध्ये विधानसभा निवडणूक आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत डिंपल यादव प्रत्येक टप्प्यावर पती अखिलेश यादव यांच्यासोबत दिसल्या. तसेच सासरे मुलायम सिंग यांची कमतरता दूर करण्यासाठी अनेक रॅली केल्या.
-
मात्र, यंदा मुलायम सिंग यांची एक सून अपर्णा यादव यांनी सपाला रामराम ठोकलाय, तर डिंपल यादव देखील निवडणूक सभांपासून दूर असल्याचं दिसतंय.
-
अखिलेश यादव यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मुलायम सिंग यादव यांनी सोबत बसून डिंपल यादव यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
-
अपर्णा यादव यांनी सपाकडे लखनौ कँटचं तिकीट मागितलं होतं का? यावर उत्तर देताना अखिलेश म्हणाले की मुलायम सिंग आणि मी कुटुंबातील कमीत कमी लोक निवडणूक लढतील असा निर्णय घेतला होता.
-
घरातून कमीत कमी लोकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने घरातील लोकांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं, असं अखिलेश यांनी सांगितलं.
-
मुलायम सिंग यादव यांच्यासोबत पक्षाने घराणेशाहीला प्रोत्साहन मिळू नये असा निर्णय घेतला होता. त्यामुळेच घरातील कमीत कमी लोकांनी निवडणूक लढण्याचा प्रयत्न झाला. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया/पीटीआय)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”