-
निवडणुका आल्या की उमेदवारांना आपली संपत्ती जाहीर करत प्रतित्रापत्र दाखल करावं लागतं. त्यामुळे सर्वसामान्यांना या नेत्यांची संपत्तीची माहिती होते.
-
याशिवाय प्रतिज्ञापत्रांमुळे या नेत्यांवरील कर्जाचेही तपशील समोर येतात.
-
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या कुटुंबाबाबत अशीच माहिती समोर आली आहे.
-
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार यादव कुटुंबात मुलाने बापाला कर्ज दिल्यापासून आणि सुनेने सासूकडून कर्ज घेतल्याचं समोर आलंय. त्याचाच हा आढावा.
-
मुलायम सिंह यादव यांनी नुकत्याच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ते २० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या संपत्तीचे मालक आहेत. याशिवाय मुलायम सिंह यादव यांनी आपला मुलगा अखिलेश यादवकडून सव्वा दोन कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचंही यात सांगितलं आहे.
-
मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीने पतीकडून पावणे सात लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं सांगितलंय. साधना गुप्त या मुलायम सिंग यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.
-
मुलायम सिंह यांचे बंधू शिवपाल यादव यांनी त्यांची डॉक्टर मुलगी अनुभा यादव यांच्याकडून साडे तीन लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं सांगितलंय.
-
नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये सपातून उत्तर प्रदेश निवडणूक लढवली. तेव्हा त्यांनी सासरे मुलायम सिंह यादव यांच्याकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतल्याचं म्हटलं होतं.
-
अपर्णा यादव यांच्यावर सासू साधना गुप्ता यांचंही कर्ज होतं. अपर्णा यांनी सासू साधना गुप्ता यांच्याकडून १ लाख रुपये कर्ज घेतलं होतं.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई