-
अदिती सिंह भाजपाच्या आक्रमक आणि तरूण नेत्या आहेत. कधीकाळी उत्तर प्रदेश काँग्रेसचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या अदिती सिंह या निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून उभ्या आहेत. आज त्यांच्या राजकीय नाही, तर व्यक्तिगत आवडी निवडींविषयी जाणून घेऊयात.
-
अदिती सिंह रायबरेली मतदारसंघातून उभ्या राहण्याआधी त्यांचे वडील अखिलेश सिंह यांचा या मतदारसंघात दबदबा होता.
-
रायबरेलीत १९८९ पासून अखिलेश सिंह यांचं वर्चस्व होतं. २०१७ मध्ये त्यांनी मुलगी अदिती सिंहला रायबरेली विधानसभा मतदारसंघातून आपला राजकीय वारस केलं. त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटीवर निवडणूक लढणाऱ्या अदिती सिंह यांनी बसपाच्या मो. शाबाज खान यांना ८९ हजार १६३ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं.
-
मात्र, पक्षांतर्गत नाराजीनंतर अदिती सिंह यांनी काँग्रेसला रामराम करत २३ नोव्हेंबर २०२१ रोजी भाजपात प्रवेश केला.
-
आता जाणून घेऊयात अदिती सिंह यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडींविषयी. अदिती सिंह यांची आवडती अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे.
-
अदिती सिंह यांनी एका मुलाखतीत ऐश्वर्या रायचा उल्लेख करत ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगितलं.
-
अदिती सिंह म्हणाल्या, “मी जेव्हा ऐश्वर्या राय यांची पहिली भेट घेतली तेव्हा ‘ताल’ चित्रपटाची शूटिंग सुरू होती. अदिती सिंह यांच्या वडिलांनी कोणाशी तरी फोनवर चर्चा केली आणि अर्ध्या तासात अदिती यांना चित्रीकरणाच्या सेटवरच ऐश्वर्या राय यांची भेट घेता आली.
-
जवळपास २५ मिनिटे ऐश्वर्या रायसोबतची भेट झाली. यात अदिती सिंह ऐश्वर्या राय यांचं कौतुक करत होत्या मात्र ऐश्वर्याने असं काही म्हटलं की अदिती चकित झाल्या.
-
ऐश्वर्याने या भेटीत अदिती सिंह आपल्या लहान बहिण आहेत असं सांगत ‘यू आर सो ब्यूटिफुल’ असं म्हटलं. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल