-
Madhya Pradesh Election Results : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंतच्या अपडेटनुसार भाजप पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सत्तेवर येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १६ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्यावर मध्यप्रदेशातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
-
मध्य प्रदेशात भाजपच्या विजयासाठी शिवराजसिंह यांच्या लाडली ब्राह्मण योजनेचा मोठा हात असल्याचे निवडणूक विश्लेषक सांगत आहेत.
-
मध्य प्रदेशातील लाडली ब्राह्मण योजनेअंतर्गत १.३१ कोटी महिलांना दरमहा १,२५० रुपये मिळतात. ही योजना शिवराज यांच्यासाठी गेम चेंजर ठरली.
-
७ कोटी लोकसंख्या असलेल्या मध्य प्रदेशात लाडली ब्राह्मण योजनेच्या लाभार्थ्यांनी भाजपला भरभरून मतदान केले.
-
राज्यातील काँग्रेसचे पारंपारिक मतदार समजल्या जाणाऱ्या एससी-एसटीमध्येही भाजपने प्रवेश केला असून, यामागेही लाडली ब्राह्मण योजनाच कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे.
-
शिवराजसिंह चौहान हे ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर यंदा त्यांच्यासह भाजप मध्य प्रदेशातून हद्दपार होणार असं विरोधकांनी गृहीत धरलं होतं.
-
निकालाचा कल पाहता, पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील जनतेवर शिवराजसिंह यांची जादू चालल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…