-
शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण आठ उमेदवारांची नावे आहेत.
-
विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांना हातकणंगलेमधून शिवसेनेने परत संधी दिली आहे.
-
रामटेक मतदारसंघात काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या राजू पारवे यांना उमेदवारी मिळाली आहे.
-
मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघाचे खासदार असलेल्या हेमंत पाटील यांनाही शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.
-
विदर्भातील बुलढाण्यात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी
-
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाचं शिवसेनेने संधी दिली आहे.
-
संजय मंडलीक कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवतील त्यांचही नाव या यादीत आलेलं आहे.
-
मुंबई दक्षिण मध्यमधून खासदार राहुल शेवाळे हेच पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार आहेत.
-
विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना मावळ येथून पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल