-
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांनी पाच वर्षांनंतर ठाकरे गट सोडून पून्हा एकदा काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
-
मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काल (३१ मार्च) रोजी, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
-
दिवंगत नेते, माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे पुत्र असलेले दिलीप माने हे २००९ साली दक्षिण सोलापूरमधून विधानसभेवर निवडून गेले होते.
-
२००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघात अपक्ष म्हणून लढत दिली होती.
-
२०१४ साली ते काँग्रेसच्या चिन्हावर दक्षिण सोलापूर विधानसभा जागेवर उभे राहिले असता भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
-
२०१९ साली बदलते राजकीय वारे पाहून ते शिवसेनेत गेले आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना आव्हान दिले होते. (Photo-ANI)
-
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह ब्रह्मदेवदादा सहकारी बँक, दोन खासगी साखर कारखाने, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांची ताकद आहे.
-
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दिलीप माने हे आपल्या सहका-यांसह स्वगृही परतल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
-
(फोटो- Express Photos By Ganesh Shirsekar)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख