-
कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या पक्षाची सत्ता यावी असे वाटते. भारतीय जनता पक्षाचेही असेच स्वप्न होते.
-
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते भक्कमपणे साकार झाले ते नरेंद्र मोदी यांच्या रूपाने.
-
गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी यांना भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा बनवला.
-
मोदींच्या गुजरातमधील विकास मॉडेलला संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा करून भाजपाने काँग्रेस आघाडीला पराभूत केले.आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.
-
त्यानंतर २०१९ मध्येही काँग्रेस आघाडीला पराभूत करून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.
-
पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
-
२००२ मध्ये गुजरातमधील राजकोट त्यानंतर २००७ मध्ये मणीनगर या मतदासंघामधून नरेंद्र मोदी आमदार म्हणून निवडून आले. २००२ ते २०१४ नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले. २०१४ मध्ये वडोदरा आणि वाराणसी दोन्ही ठिकाणाहून ते लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकले.
-
आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथूनच लढणार आहेत. ‘अबकी बार ४०० पार’ असं म्हणणाऱ्या भाजपाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यावेळेसही सत्तेत टिकून राहणं शक्य होईल का? हे तर येणारा काळच सांगेल.
-
(सर्व फोटो सौजन्य – Express Photos)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”