-
पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी १२ मार्च २०२४ या दिवशी मनसेला सोडचिठ्ठी दिली. (सर्व फोटो-वसंत मोरे फेसबुक पेज)
-
मागच्या दोन वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील पक्ष संघटनेचा वाद सुरू होता. लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असताना पक्षाची स्थिती निवडणूक लढवण्यासारखी नसल्याचा अहवाल राज ठाकरेंपर्यंत पाठवला जात असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला होता.
-
१८ वर्ष सुरू असलेला मनसेतील प्रवास वसंत मोरे यांनी थांबवला. त्यानंतर त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
-
वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होणारे फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करत आपला राजीनामा दिला होता.
-
पुणे महानगरपालिकेत विरोधीपक्षनेते पद भूषविलेले वसंत मोरे कात्रजमधून मनसेचे नगरसेवक राहिलेले आहेत.
-
राजीनामा दिल्यानंतर दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवार, प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
-
कोणत्या पक्षाने संधी दिली नाही तर, लोकसभा निवडणूक अपक्ष लढू अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.
-
त्यानंतर काल वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत वसंत मोरे यांना पुणे येथून उमेदवारी जाहीर केली आहे.
-
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, नगरसेवक म्हणून काम करतांना जो विकासाचा पॅटर्न राबवला तोच पॅटर्न पुणे शहराच्या विकासासाठी राबवणार असल्याचं वसंत मोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल