-
देशातील लोकसभा निवडणुकांच बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. (फोटो-लोकसत्ता)
-
१९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. (फोटो-लोकसत्ता)
-
भारतातील लोकशाहीचा ‘आगळावेगळा’ उत्सव म्हणजेच देशातील लोकसभा निवडणुका. (फोटो-लोकसत्ता)
-
याच पार्श्वभूमीवर देशातील बाजारपेठांमध्ये आता निवडणुकीत प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. (Express photo by Pradip Das)
-
काँग्रेस, भाजपा या मुख्य पक्षांचे झेंडे, स्टिकर, मफलर तसेच पक्षांची चिन्हे असलेली विविध सामग्री देशातील बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांकडून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. (Express photo by Pradip Das)
-
सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून निवडणुकांच्या निमित्ताने या वस्तुंची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. (Express photo by Pradip Das)
-
बाजारपेठांमधील प्रचाराचे साहित्य हा सामान्य जनतेसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. (Express photo by Pradip Das)
-
यावर्षी देशामध्ये १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचे मतदान होत आहे. (Express photo by Pradip Das)
-
महाराष्ट्रामध्येही एकूण ५ टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होणार आहे. (फोटो-लोकसत्ता)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य