-
भाजपाने जळगावमधून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर उन्मेश पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. (Photo-Unmesh Patil facebook)
-
उन्मेश पाटील हे चाळीसगावमधून २०१४ ला आमदार म्हणून निवडून आले होते. (Photo-Unmesh Patil facebook)
-
उन्मेश पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटीवर विजयी झालेले विद्यमान खासदार आहेत. (Photo-Unmesh Patil facebook)
-
उन्मेश पाटील यांनी दि. (३ एप्रिल) रोजी शिवसेना (उबाठा गट) पक्षात प्रवेश केला आहे. (Photo-Unmesh Patil facebook)
-
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले होते. (Express Photo by Amit Chakravarty)
-
उन्मेश पाटील यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. (Express Photo by Amit Chakravarty)
-
“आम्हाला बदल्याचं नव्हे तर बदलाचं राजकारण हवं आहे. पद महत्वाचं नाही. परंतु, आमची अवहेलना करण्यात आली, मला वैयक्तिक मानसन्मान नको, पण कार्यकर्त्यांची जेव्हा अवहेलना होते तेव्हा घुसमट होते. राज्यात विकासाऐवजी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे. परंतु, मला त्या पापातला वाटेकरी व्हायचं नाही.” अशी प्रतिक्रिया उन्मेश पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर दिली आहे. (Express Photo by Amit Chakravarty)
-
दरम्यान, भाजपाने उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारली असल्याने उबाठा गटाकडून त्यांना जळगावमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. (Photo-Unmesh Patil facebook)
-
जळगावमध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी भाजपाच्या स्मिता वाघ की उबाठाचे उन्मेश पाटील? यांच्यापैकी कोण बाजी मारणार, हे ४ जून रोजी दिसेल.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य