-
२००९ पूर्वी वैशाली दरेकर या शिवसेनेतचं (उबाठा) होत्या. (सर्व फोटो सौजन्य – वैशाली दरेकर-राणे, फेसबुक पेज)
-
परंतू २००९ मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेमधून त्यांनी २००९ ची कल्याण लोकसभा निवडणूक लढली आहे. त्यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली होती.
-
वैशाली दरेकर २०१० मध्ये कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसे तर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
-
यापूर्वी वैशाली दरेकर यांनी विरोधी पक्षनेता म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कामं केलं आहे.
-
त्यानंतर वैशाली दरेकर मनसे सोडून पुन्हा शिवसेना उबाठा गटात गेल्या.
-
शिवसेनेतील फुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेत (उबाठा) राहिल्या.
-
शिवसेना उबाठा गटाने काल (३ एप्रिल) रोजी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
-
दरम्यान, कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.
-
यावेळी महायुतीचे श्रीकांत शिंदे की महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर? यांच्यापैकी कोण बाजी मारणार, हे ४ जून रोजी कळेल.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य