-
माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (३ एप्रिल) केरळमधील वायनाड मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी याच वायनाडमधून २०१९ साली विजय मिळवला होता.
-
२०१४ आणि २०१९ ला राहुल यांनी आणखी एका जागेवरुन लोकसभा निवडणूक लढवली होती, ती जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील अमेठी.
-
त्यामुळे राहुल गांधी यांनी वायनाडमधून शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल केला असला तरी ते अमेठीमधूनही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार का? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
-
राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये वायनाडमधून ४ लाखांहून अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला होता. पण त्याचवेळी अमेठीमध्ये त्यांना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
-
२०१४ सालीही मोदी लाटेत राहुल गांधी यांच्या अमेठीतील जागेवर स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत केले होते. यावेळीही वायनाडसह अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढवतील अशी चर्चा होत आहे.
-
या पार्श्वभूमीवर, संभाव्य लढत लक्षात घेता भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी, राहुल गांधी यांच्यविरोधात प्रचार सुरू केला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी अमेठीमध्ये दौरे सुरु केले आहेत.
-
दरम्यान, २०२४ मध्येही राहुल गांधी यांच्या विरोधात लढण्याची पूर्ण तयारी झालेली असून राहुल गांधी यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागेल, असे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.
-
राहुल गांधी अमेठीतून लढतील का नाही? याबाबत काँग्रेसने अजूनही मौन बाळगने पसंत केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – राहुल गांधी, फेसबुक पेज)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”