-
सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांना, विविध पक्षांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. (Photo-Hema Malini Fb Page)
-
छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरील कलाकार यावर्षी (२०२४) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोण आहेत हे कलाकार? जाणून घेऊ (Photo-Kangana Ranaut Fb Page)
-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतला भाजपाने तिकीट दिलं आहे. हरियाणातील मंडी या जागेवरुन कंगणा रनौत लोकसभा निवडणूक लढत आहे. (Photo-Kangana Ranaut Fb Page)
-
प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा याने, २८ मार्चला शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. गोविंदाला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. (Photo-Eknath Shinde Fb Page)
-
दूरदर्शनवरील ‘रामायण’ या मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल यांना भाजपाने या निवडणुकीत तिकीट दिलं आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ या जागेवरुन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Photo-Arun Govil Fb Page)
-
पश्चिम बंगालमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे निवडणूक लढवत आहेत. आसनसोल या जागेवरुन त्यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. (Photo-Shatrughan Sinha Fb Page)
-
उत्तर प्रदेशच्या मथुरा येथिल भाजपा खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी या तिसऱ्यांदा या जागेवरुन लढत आहेत. (Photo-Hema Malini Fb Page)
-
तर उत्तर प्रदेशच्याच गोरखपुरमधून, भोजपुरी अभिनेता रविकिशन भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. (Photo-Ravi Kishan Fb Page)

स्वारगेट बलात्कार प्रकरण : बस स्थानकातील सीसीटीव्हींबाबत महत्त्वाची माहिती, कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी…